Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी साजरी केली अम्माचा टिफिन परिवरासह दिवाळी

चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्माचा टिफिन परिवाराला त्यांच्या राजमाता निवासस्थानी आमंत्रीत करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी स्नेहमीलन आणि आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार, डाॅ. तुषार साखरे, डाॅ. अरबाज पठाण, डाॅ. रुचिता दास, डाॅ. दक्षता लाढे, प्रयोग शाळा तज्ञ सुनिल पागे, अधिपरिचारीका सुबिधा काकडे, आशा गेडाम, आदींची उपस्थिती होती.
MLA Kishore Jorgewar celebrated Diwali with Amma's tiffin family
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात अम्माचा टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमा अंतर्गत गरजुंना घरपोहच जेवनाचा टिफिन पोहचविला जात आहे. अम्माचा टिफिन उपक्रम आता विस्तारित होत असुन अम्माचा टिफिन हा मोठा परिवार बनला आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवाळी सण साजरा करण्यासाठी अम्माचा टिफिनच्या परिवाराला घरी आमंत्रित केले होते. यावेळी सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच निशुल्क औषध उपचार करण्यात आला. यावेळी आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्माचा टिफिन परिवारासह भोजन करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. मनात असलेली संकल्पा पूर्ण करता आली याचा आनंद आहे. अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांनी अम्माचा टिफिन या उपक्रमाला भेट देत कौतुक केले आहे. हा उपक्रम यशस्वी होत आहे. यात स्वयंपाक करणा-र्यांपासुन डब्बे घरोघरी पोहचविण्याचे अविरत काम करण्या-र्यांचाही मोठा वाटा आहे. आज तिनशे ते चारशे लोकांचा हा परिवार झाला आहे. या परिवाराचा प्रमुख म्हणुन केवळ जेवनच पोहचवुन चालणार नाही तुमच्या आरोग्याची काळजी ही मला घ्यायची आहे. यासाठी महिण्यातुन एकदा आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत. पूढे हा परिवार आणखी मोठा होणार याचीही मला आशा आहे. तुमच्या सोबत दिवाळी साजरी करत असतांना आनंद होत आहेच सोबतच त्यांना आधार नाही त्यांचा आधार बनु शकलो याचे समाधानही वाटत असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वदंना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, सायली येरणे, अस्मिता डोणारकर, प्रेमिला बावणे, आशु फुलझेले, अल्का मेश्राम, जमिला मेश्राम, सरोज चांदेकर, वैशाली रामटेके, अनीता झाडे, कविता निखारे, रुबीना शेख, कौसर खान, वंदना हजारे, वैशाली मद्दीवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment