Ads

ब्रह्मपुरी सेक्स रॅकेटची मुख्य सूत्रधार अटकेत

चंद्रपुर :- सध्या विदर्भात गाजत असलेल्या ब्रह्मपुरी सेक्स रॅकेट प्रकरणातील नागपूरची मुख्य सूत्रधार सिमरन उर्फ अक्षदा सुनील ठाकूर(२६) हिला नागपूरवरून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
Brahmapuri sex racket chief arrested
दरम्यान, शुक्रवारीचंद्रपूरच्या न्यायालयात हजर केले असतातीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीआहे. या प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनीमोठी कामगिरी बजावली असून, सिमरनच्यापीसीआर दरम्यान आणखी काही नावे पुढेयेण्याची शक्यता आहे.

कोलकता येथून अपहरण झालेली एकअल्पवयीन मुलगी ब्रह्मपुरीत असून विदर्भ इस्टेट कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहणारे
लोणारे दाम्पत्य तिच्याकडून
देहविक्री करीत असल्याची तक्रार नागपूरच्या एका सामाजिक संस्थेने दिली होती. त्या तक्रारीवरुन १७ सप्टेंबरला पोलिसांनी सापळा रचून त्या अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपींवर मानव तस्करी अधिनियम पोस्को, पिटा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करीत मंजित रामचंद्र लोणारे व चंदा मंजीत लोणारे या दाम्पत्याला अटक केली होती. ब्रह्मपुरीतील लोणारे दाम्पत्याच्या पोलीस कोठडीदरम्यान नागपूरची सिमरन ही मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. मात्र सिमरन फरार होती. आरोपी लोणारे दाम्पत्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीवर अत्याचार करणारे वडसा येथील अरविंद इंदूरकर, शिवराम हाके, राजकुमार उंदिरवाडे, मुकेश बुराडे तर लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर, सौरभ बोरकर, गौरव हरिणखेडे यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या लोणारे दाम्पत्यासह इतर सर्व ९ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, नागपूर येथील मुख्य सूत्रधार
सिमरन उर्फ अक्षदा सुनील ठाकूर हिला गुरुवारी नागपूरवरून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सिमरनची तीन दिवस
पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

त्यामुळे या तपासात आणखी काही नावे पुढे येऊन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताआहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment