Ads

भाऊच्या दांडीयात ताईंचे दांडिया नृत्याने सर्वांचे वेधले लक्ष

चंद्रपूर :- शहरात मागील नऊ दिवसांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भाऊचा दांडिया सुरू आहे. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार प्रतिभा धानोरकर गाण्यावर नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गाण्यावर चांगलाच ठेका धरला. व्हिडीओमध्ये त्या महिलासोबत नृत्य करताना दिसत आहेत.Bhau's Dandiya Tai's Dandiya dance caught everyone's attention

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर सहभागी झाल्या होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment