Ads

भद्रावती शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये महाराष्ट्रात पहिल्या ५ मध्ये ..!

भद्रावती(जावेद शेख):-भद्रावती नगर परिषदेने सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवेत भद्रावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे स्वच्छ सर्वेक्षण सुरु झाल्या पासून प्रत्येक वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वच्छतेचा दर्जा उंचावत आहे. या वर्षी सुद्धा नुकत्याच दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर झालेल्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेच्या निकालात नगरपालिकेस देशातून १ लाख लोकसंख्या खालील गटात पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळालेले आहे. सोबतच कचरा मुक्त शहर तपासणीत शहराला प्रथमच ३ तारांकित मानांकन प्राप्त झाले असून पश्चिम विभागात ६ वा महाराष्ट्र राज्यातून ५ वा तसेच नागपूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.Bhadravati City in Top 5 in Maharashtra in Swachh Survekshan 2022.!
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये भद्रावती शहरातील सर्विस लेवल प्रोग्रेस अंतर्गत विलगीकृत कचरा संकलन प्रणाली, प्रक्रिया आणि विल्हेवाट प्रणाली, शाश्वत • विकास व सफाई मित्र सुरक्षा इत्यादी बाबीची पाहणी व पडताळणी केली गेली. यादरम्यान स्वच्छतेच्या बाबतीत शहरातील नागरिकांचा अभिप्राय व नागरिकांचा अनुभव सुद्धा नोंदवून घेतला गेला, तसेच अभियान काळात शहरातील नागरिकांचा यामध्ये सहभाग वाढावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा उदा. चित्रकला, कविता, भित्तीचित्र, पथनाट्य व शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा- महाविद्यालय, हॉटल्स यांचे करीता स्वच्छता रैंकिंग स्पर्धाच आयोजन करून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता आकर्षक बक्षिसे तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री मा. श्री प्राजक्त तनपुरे, चंद्रपूर-वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. श्री बाळूभाऊ धानोरकर व वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघाचे आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. सदर सर्वेक्षणातील कचरा मुक्त शहर मानांकन (Grc) व उघड्यावर शौचमुक्त शहर मानांकन (ODF) त्रयस्थ यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या तपासणी करण्यात आलेली आहे. कचरा मुक्त शहर मानांकन KGFC) व उघड्यावर शौचमुक्त शहर मानांकन (ODF) व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करीताचे दस्तावेजीकरण करण्यावर सुद्धा गुण असल्याने सदर दस्तावेजीकरण न.प. भद्रावती चे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले..
भद्रावती शहर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये २०१८ मध्ये सहभागी झाल्यापासून भद्रावती शहराने स्वच्छतेच्या बाबतीत केलेल्या कामगिरीचा सातत्यपूर्ण चढता आलेख खाली दिलेल्या तक्तावरून पाहता येईल. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ दरम्यान कोविड - १९ कोरोना विषाणूचा काळ असून सुद्धा भद्रावती शहराने त्यामध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावर कामगिरी उंचावत पश्चिम विभागात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटात नाविन्यपूर्ण व चांगल्या सवयी राबविल्या बाबत सर्वोत्कृष्ट शहराचा मान मिळवून दिल्ली येथे केंद्रीय नगर विकास व गृह निर्माण मंत्री मा. श्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.

पालिकेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे व विशेष म्हणजे शहरातील नागरिक, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था, शाळा. विद्यालय-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर सहकार्य केल्याने पालिकेला हे यश मिळू शकले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष श्री अनिल धानोरकर यांनी व्यक्त केली तसेच सर्वांचे अभिनंदन करून शासनाने स्वच्छते बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना जसे कि घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी किवा इतरत्र न टाकता घंटागाडीमध्येच टाकून त्याचे पालन कारावे असे आवाहन व केलेल्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.

भद्रावती शहर यावर्षी सुद्धा स्वच्छ सर्वेक्षण २०२३ करीता सहभागी झाले असून शहराला ५ तारांकित शहराचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठीचे तसेच राज्यात प्रथम ३ स्वच्छ शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन नगर परिषदे मार्फत कृती योजना तयार करण्यात आली असून त्या अंतर्गत नियोजित विविध स्पर्धा व उपक्रमांत वैयक्तिक तसेच सामुहिक पातळीवर सहभाग दर्शवावा व स्वच्छते बाबतील पालिकेस सहकार्य करावे असे विनंती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुर्यकांत पिदुरकर यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment