Ads

7 ऑक्टोंबर ला चंद्रपूर शहरात 'वर्ल्ड वॉकींग डे' चे आयोजन

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- इंटरनॅशनल ऑलंधीक कमेटी द्वारा मान्यता प्राप्त द असोसिएशन फॉर इंटरनॅशनल स्पोर्टस फॉर ऑल (TAFISA) च्या नेतृत्वा मध्ये संपुर्ण विश्वात 'वर्ल्ड वॉकिंग डे के 2022' चे आयोजन 2 ऑक्टोबर ते 30
ऑक्टोबर 2022 ला ग्लोबल स्पोर्टस गुव्हमेंट च्या रूपाने सुरू आहे. जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व द असोसिएशन द्वारेसकाळी 7.30 वाजता गांधी चौक पासुन चांदा क्लब ग्राऊंड पर्यंत विश्व पैदल चाल दिवस (वर्ल्ड वॉकिंगडे - 2022 ) चंद्रपूर शहर मध्ये 7 ऑक्टोंबर 2022 ला आयोजन होत आहे.
'World Walking Day' in Chandrapur city on 7th October
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.श्री. सुधिरभाऊ गुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपुर तथा मा. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार चंद्रपूर यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी मा. अतुल गुल्हाणे सर, पोलीस अधिक्षक मा. अरविंद साळवे सर, शिक्षणाधिकारी (माध्य.) मा. सौ. कल्याण चव्हाण, समाज कल्याण आयुक्त मा. अगोल यावलीकर, जिल्हा क्रिडा अधिकारी मा. अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्र चे जिल्हा युवा अधिकारी मा. शमशेर सुभेदार, जिल्हाध्यक्ष योग नृत्य परिवार गा. अशोक मुंदडा व तफिसा इंटरनॅशनल चे जिल्हाप्रमुख रेंशी दुर्गराज एन. रामटेके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजन होत आहे.

TAFISA, AIASFA, AMASA, PASFAC या संघटनेची अशी इच्छा आहे की, जगानेया पूर्वी कधीही न पाहिलेली जागतिक सर्वांना प्रवेश असलेल्या आणि सर्व समावेशक 24 तास रिलेअसलेल्या या वर्ल्ड वॉकिंग डे 2022 मध्ये आमच्या बरोबर उभे राहावे

तेव्हा शहरातील सर्व शाळा, कॉलेज, क्रिडा मंडळ, क्लब व सर्व हौशी क्रिडा प्रेमी यांनी या स्तरावर 'द असोसिएशन ऑफ स्पोर्टस अँड फिटनेस फॉर ऑल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट या मान्यता प्राप्त जिल्हा संघटनेच्या साहाय्याने विश्व पैदल दिवसा मध्ये सामील व्हावे असे आव्हान आयोजन समितीचे आशुतोष गयनेवार, निलेश गुंडावार, अॅड. राजरत्न पथाडे, मनिष सारडा, वाल्मिक खोब्रागडे, दुष्यंत नगराळे, राजु साखरकर, अल्का मोटघरे, अरविंद बनकर, बंडु रामटेके, वनश्री मेश्राम, डॉ. विजय सोमकुवर, सिमा ठाकुर, अॅड. दिना बोरकर, सौ. कंचन रौनी, संदिप पेटकर, कु. आचल हिवरकर, कु· पलक शर्मा यांनी केलेले आहे. सविस्तर माहितीसाठी सर्व इच्छुकांनी 9067758618 वर संपर्क साधावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment