राजुरा :- Crime Newsराजूरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकेबंदी करीत सुमो वाहनासह प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालकास अटक करण्यात आली.
दि. 25/10/22 रोजी राजूरा पोलिस स्टॉप पेट्रोलिंग करीत असतांना मौजा वाकडी वरून राजुराकडे पांढऱ्या रंगाचे सुमो गोल्ड गाडी क्र. एम. एच 34 ए.एम 3024 या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलले सुंगधीत तंबाखू विक्री करीता घेवून येत असल्याच्या गुप्त माहितीवरून राजुरा ते आसिफाबाद रोडवरील सोंडो ते वरूर रोडवर सापळा रचुन नाकेबंदी करीत असतांना सदर वाहन थांबवून वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखु संबधाने कायदेशिररित्या झडती घेतली असता वाहनामध्ये 10,16,350 रुपयांचा शासनाने बंदी घातलेल्या व लोकांच्या आरोग्यास धोका असलेले सुगंधीत तंबाखु / पान मसाला वर्णनाचा मुद्देमाल आढळून आला. वाहन चालक युवराज उर्फ आकाश चंद्रभान तिवारी वय २५ वर्ष., रा. कोठारी याला अटक करण्यात आली.
Rajura Police राजूरा पोलीसांनी वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखु संबधाने कायदेशिर रित्या झडती घेतली असता वाहनामध्ये ईगल हुक्का शिशा तंबाख्नु असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबंद 92 नग पाउच प्रत्येकी 340 रू प्रमाने एकूण किंमत 31280/- रुपये, मजा 108 हुक्का शिशा तंबाखू प्रत्येकी 50 ग्रॅमचे सिलबंद 398 नग डब्बे, प्रत्येकी 235 रू. प्रमाणे एकूण कि 93,530 /- रुपये, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबद 476 नग डब्बे प्रत्येकी 235 /- रूपये प्रमाण एकूण कि 4,45,060 /- रुपये, विमल पान मसाला असे नाव असलेले 104 सिलबंद पाउच प्रत्येकी 120 रू प्रमाणे एकूण कि. 12480/- रुपये, सिगनेचर फिटनेस पान मसाला 75 सिलबंद पुडी प्रत्येकी 320 रू नग प्रमाणे कि. 24000/- रुपये तसेच प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू वाहतुकी करीता वापरलेले एक पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्र एम एच 34 ए एम 3024 अंदाजित किंमत 4,00000/- रुपये व वाहन चालक युवराज उर्फ आकाष चंद्रभान तिवारी यांचे ताब्यातील एक विवो 21 प्रो कपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 10,000/ रुपये असा एकूण कि. 10,16350/- ररुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. अन्न सुरक्षा अधीकारी व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन चंद्रपुर याना माहिती देण्यात आली त्यांचेकडून कार्यवाही होताच पुढील कार्यवाही करण्यात येते.
0 comments:
Post a Comment