Ads

सतत नापिकी ओला दुष्काळ व कर्जबाजारी पणामुळे कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पोंभुर्णा :- पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथे रणधीर जनार्धन जाधव, वय - ४४, राहणार वेळवा ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर या शेतकऱ्याने वारंवार च्या नापिकी, ओला दुष्काळ व कर्जबाजारी पणाला कंटाळून आपली जीवनलिला संपविलेली आहे.Tired of constant barren wet drought and indebtedness, the farmer commits suicide
रणधीर जनार्धन जाधव हा अंगाने धडधाकड व मेहनती तरुण होता आपल्या अत्यल्प असलेल्या शेतीवर काबाडकष्ट करून आपली व आपल्या एक मुलगी जिचे नाव सुप्रिया वय वर्ष १७ व मुलगा ओम वय वर्ष १५, व पत्नी या एकूण चार लोकांच्या संसाराचा गाडा हाकत असतांना शेतीत वारंवार तोटा होतं होता, बी-बियाणे, खत, किटकणाशे व इतर संसाधनांचा खर्च सुद्धा निघत नव्हता. त्यामुळे स्व रणधीर जनार्धन जाधव यांनी रोज शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ ला रात्रौ ०८:०० वाजता शेतपिकावर किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आणलेले जहरिले कीटकनाशक पिऊन आपली जीवनलिला संपविण्याचा प्रयत्न केला, तसेच लगेच त्यांना पोंभुर्णा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी नाडी पाहून लगेच चंद्रपुरला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले, पण चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा नसल्याने या शेतकऱ्याला सकाळी १०.३० वाजता चंद्रपुरातील नामवंत डॉ. आनंद बेंदले यांच्या बेंदले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रणधीर हा उपचाराला साथ देत नव्हता असे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितले. नातेवाईकांनी सर्व प्रकारचे उपचार करण्यास सांगितले पण आजच दिवसभराच्या उपचारानंतर शनिवार आज त्याचा मृत्यु झाला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment