Ads

मांगली येथील कामचुकार व मद्यपी लाईनमनला निलंबीत करा.

भद्रावती ता.प्रतिनिधी:-तालुक्यातील मांगली येथे नियुक्त करण्यात आलेला लाईनमन मद्यपी व कामचुकार असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत असुन या भागातील विद्युत पुरवठा सतत खंडीत रहात आहे.त्यामुळे या मद्यपी आणी कामचुकार लाईनमनला तात्काळ निलंबीत करुन त्याचे ठिकाणी कर्तव्यदक्ष असलेल्या लाईनमनची नियुक्ती करावी अशी मागणी मांगली येथील शेतकऱ्यांनी भद्रावती विज कंपणीच्या सहाय्यक अभियंत्याला सादर केलेल्या एका निवेदनातून केली आहे.Suspend the rowdy and drunken lineman at Mangli.
मांगली परिसरात सध्या शेंडे नामक लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. हा लाईनमन अत्यंत कामचुकार असुन तो सतत दारुच्या नशेत राहतो.व आपले कर्तव्य निट पार पाडत नाही. त्याच्या या कामचुकारपणामुळे या परिसरातील विद्युत व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे.तो शेतकऱ्यांच्या तक्रारिची दखल घेत नसल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही.परिणामी त्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. सदर लाईनमन शेतकऱ्यांशी ऊध्दटपणे वागतो व आपले काम रेंगाळत ठेवतो.या लाईनमन च्या कामचुकारपणामुळे शेतकर्यांना अनेकदा पैसे देऊन खासगीरित्या काम करवून घ्यावे लागते.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंडही सोसावा लागतो. सध्या या परिसरात धानपिकाला पाण्याची आवश्यकता असुन विज पुरवठा खंडीत राहात असल्याने धानपिकाला पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्या लक्षात घेऊन या लाईनमनला निलंबीत करुन या ठिकाणी कर्तव्यदक्ष लाईनमनची नियुक्ती करावी व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment