Ads

वेकोली कॉलोनीत तातळीनेपाणी पुरवठा करा अन्यथा जन आंदोलन छेडू : राजुरेड्डी

घुग्घूस :-सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने वर्धा नदीच्या पाण्यात प्रचंड अशी वाढ झाल्याने वेकोलीच्या वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या नदीच्या पाण्यात बुडाल्या यामुळे रामनगर,गांधी नगर,सुभाष नगर,शास्त्री नगर,इंदिरा नगर,बंगाली कॅम्प या परिसरात आठ दिवसां पासून पाण्याची प्रचंड अशी टंचाई निर्माण झाली.
Supply water to WCL Colony urgently or we will start mass agitation: Raju Reddy
पाण्या करिता नागरिकांची होत असलेली होरपळ लक्षात घेत काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष राजूरेड्डी यांनी चार - चार वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू केला.

मात्र नागरिकांची गरज लक्षात घेता ही मदत कमी पडत असल्याने काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व इंटक नेते लक्ष्मण सादलावार यांच्या नेतृत्वाखाली वेकोली सब एरिया यांना पाणी टंचाई दूर करण्यासाठी
तातळीने पाणी पुरवठा सुरू करण्या संदर्भात वेकोली अधिकारी फुल्लारे यांना भेटून मागणी केली व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला

वेकोली अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण फिल्टर प्लांटची पाहणी केली.
आज सांयकाळ पर्यंत एका पंप द्वारे पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती फुल्लारे यांनी दिला याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,बालकिशन कुळसंगे,सन्नी दुर्गम,कपिल गोगला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment