Ads

सिंदेवाही नगरपंचायत प्रभागातील विविध समस्यांचे निराकरण करा..निवेदनद्वारे केली मागणी

(प्रशांत गेडाम )सिंदेवाही :- सिंदेवाही लोणवाही नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. १७ मध्ये विविध समस्या आहेत , त्यामध्ये प्रभागात अनियमित पाणी पुरवठा होणे , वॉटर एटीएम मध्ये वारंवार बिघाड होणे , तसेच पिण्याच्या पाण्यात नारू आढळणे , अशा समस्या आहेत , तसेच प्रभागात २००० लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीच्या मागणीचा ठराव मंजूर होऊन सुद्धा प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.Solve various problems in Sindewahi Nagar Panchayat Ward..Demand made by statement
अशा अनेक समस्यांसाठी तसेच प्रभागातील दुसावार कॉलनीमध्ये नैताम ते नागमंदिर दरम्यान नाली बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम अर्धवट होत आहे. त्यामुळे ते बांधकाम पूर्ण करण्याबाबत तसेच प्रभागातील अनेक समस्यांसाठी नगरसेविका सौ. अपूर्वा आशिष चिंतलवार यांनी प्रत्यक्षात पाणी पुरवठा सभापती दिलीप रामटेके , आणि बांधकाम सभापती भाष्कर नन्नावार यांना प्रभागात आमंत्रित करून त्यांच्यासह पूर्ण समस्यांच्या निराकरणासाठी पाहणी केली. आणि तात्काळ अंमलबजावणी ची मागणी केली आणि निवेदन दिले यावेळी त्यांच्यासह आशिष चिंतलवार , जावेद पठाण , नारायण पराते , रवी भरडकर , नितीन खोब्रागडे , जुली जैस्वाल , प्रतीक जैस्वाल ,आकाश मेश्राम तसेच प्रभागातील अन्य नागरिक उपस्थित होते दोन्ही सभापतींनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment