Ads

महाकाली महोत्सवात सराफा असोशिएशन देणार ८ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदीची मुर्ती

चंद्रपुर:- नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहणा नंतर सराफा असोशिएशनने महोत्सवाकरिता आठ किलो वजनाची माता महाकाली ची मुर्ती देण्याची घोषणा केली आहे.Silver Idol of Mata Mahakali weighing 8 Kg to be presented by Sarafa Association in Mahakali Festival
माता महाकाली मोहत्सवाच्या नियोजनाच्या दुस-या बैठीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. सदर बैठकीत सराफा असोशिएशने ही घोषणा केली आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली भक्तांच्या वतीने सराफा असोशिएशनचे आभार मानले आहे.Mata Mahakali festival during Navratri festival
यासाठी सराफा असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोढा, जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश सोनी, जिल्हा सचिव आशु सांगोळे, जिल्हा संपर्क सचिव भिमराज कुकरा, जिल्हा कोषाध्यक्ष मितेश लोढिया, शहर असोशिएशन अध्यक्ष भारत शिंदे, कोषाध्यक्ष प्रवीण जुमडे, सहसचिव राकेश ठकरे, सल्लागार समिती सदस्य राजेंद्र लोढा, सत्यम सोनी, कार्यकारी सदस्य प्रमोद लुनावत, संजय सराफ, मितेश लोढिया, भिवराज सोनी, विजय चांडक, विनय जैन यांच्यासह असोशिएशनच्या इतर सदस्यांनी सहकार्य केले आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात पहिल्यांदाच सुरु होत असलेल्या माता महाकाली महोत्सवाला महाकाली भक्तांचा मोठा सहभाग लाभत आहे. सदर महोत्सवात लोकसहभाग असावा या हेतुन नियोजन केल्या जात आहे. सलग चार दिवस सदर महोत्सव चालविण्याच्या दिशेने महाकाली महोत्सव समितीचे नियोजन सुरु आहे. चार दिवस शहरात भक्तीमय वातावरण राहणार असुन हा महोत्सव राज्यभरात प्रसिध्द करण्याच्या दिशेने महाकाली भक्तांच्या वतीने प्रयत्न सुरु आहे.
याबाबात महाकाली मंदिराच्या सभागृहात महाकाली महोत्सव नियोजनाची काल शुक्रवारी दुसरी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सराफा असोशिएशनने माता महाकालीची ८ किलो चांदीची मुर्ती देण्याची घोषणा केली आहे. माता महाकाली महोत्सवा दरम्याण माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. सदर पालखी यात्रेत ही चांदीची मुर्ती ठेवण्यात येणार आहे. सोबतच नवरात्रो दरम्याण सदर मुर्ती पुजा करण्यासाठी शहरातील मंदिरांमध्येही ही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

यावेळी सायंकाळी सात वाजता माता महाकालीच्या महिला भक्तांची बैठक सपन्न झाली यावेळी भारती दुधानी, डॉ. आसावरी देवतळे, अनुराधा जोशी, वंदना हातगावकर, सपना पॉल, हेमांगी बिस्वास, अॅड. इतिका शहा, स्मिता चावडा, कोकीळा पोटदुखे, रचना वनकर, सविता कोट्टी, स्नेहा मेश्राम, शितल लोहिया, एकता पित्तुलवार, सविता दंडारे, मंजु रज्जाक, मृणालीनी खाडीकर, मनिषा पडगेलवार, सरोज चांदेकर, अल्का चांडक, चंदा जिवतोडे, आशा देशमुख यांच्यासह माता महाकाली महिला भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर सायंकाळी आठ वाजता पुरुष भक्तांची बैठक संपन्न झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment