Ads

SBI क्रेडिट कार्ड ग्राहक सेवा अधिकारी म्हणून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीस वरोरा पोलिसांनी गुजरात मधून केली अटक

वरोरा (प्रति):- राज्यात किंवा देशात एखादा सायबर गुन्हा घडला की पोलिसांपुढे एक आव्हान उभं राहतं. अनेकदा अश्या गुन्ह्यात सहजासहजी आरोपी मिळत नाही. Cyber crime CARD ही एक मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेली संघटित गुन्हेगारी आहे. सायबर गुन्ह्याबाबत आरोपीला शोधून काढणे व अटक करणे हे मोठं यश असत, असंच यश वरोरा पोलिसांना मिळालं आहे. Spam link वरोरा येथे व्होल्टाज कंपनीत कार्यरत 49 वर्षीय नितीन काशिनाथ नक्षीने यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठत एक तक्रार नोंदविली.
फिर्यादी नक्षीने यांच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया चे Creadit card आहे, त्या कार्ड चे बिल दरमहिन्याला 16 तारखेला येत असते. एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्ड च्या बिलात 31 हजार रुपयांचे वाढीव बिल आले असता बिलात मोठी तफावत असल्याने नक्षणे यांनी SBI customer care मध्ये फोन लावत विचारणा केली. Credit card blocks त्यांनतर 12 मे ला सायंकाळी नक्षीने यांना नवीन नंबरवरून फोन आला, तुमचं क्रेडिट कार्ड 4 दिवसांनी बंद होणार आहे, असे सांगत फिर्यादी यांच्या मोबाईल वर त्यांना त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायला पुढच्या व्यक्तीने सांगितले. State bank of india credit card फिर्यादी यांनी त्या लिंक वर संपूर्ण माहिती भरली त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या नंबरवरून फोन आला, फिर्यादीला 4 वेळा एक नंबर त्या लिंक मध्ये टाकण्यास सांगितले, जशी माहिती मिळत होती फिर्यादी तसे करत होते. काही वेळात फिर्यादी यांच्या नंबरवर OTP आला, तो ओटीपी नक्षीने यांनी पुढच्या व्यक्तीला दिला त्यानंतर लगेच फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड वरून तब्बल 1 लाच 27 हजार 500 रुपयांचे transaction झाले. फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी याबाबत वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. पडलेला गुन्हा हा तांत्रिक पद्धतीचा असल्याने यामध्ये सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. फिर्यादी यांच्या क्रमांकावर आलेला फोन व transaction ची माहिती घेतली असता सदर पैसे Razorpay या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

सायबर पोलिसांतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जातं तरीसुद्धा नागरिक सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकत आहे. Chandrapur police success विशेष म्हणजे या गुन्ह्यात शिक्षित नागरिक अनेकदा बळी पडले आहे. मात्र सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक

userprofile.online/sbicard अशी लिंक पाठवली. सदर लिंक वर फिर्यादी यांनी क्लिक केलं असता गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात राहणारे जतीनभाई प्रद्युमनभाई राजगुरू यांच्या खात्यात सदर पैसे वळते करण्यात आले अशी माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. Cyber cell

सदर तपासाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक
अरविंद साळवे यांना देण्यात आली, त्यांनी लगेच पथक तयार करीत आरोपीच्या शोध घेण्याकरिता गुजरातला पाठविले, आरोपी जतीनभाई याला पोलिसांनी अटक केली, सदर आरोपीवर भोपाळ राज्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोब्रागडे, पोउपनी सर्वेश बेलसरे, पोउपनी सचिन मुसळे, प्रवीण निकोडे, निराशा अलोने यांनी केली. चंद्रपूर जिल्हा पोलीस नागरिकांना अश्या फसवणूक करणाऱ्या लिंक, कॉल पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment