Ads

रणरागिनी महिला सहकारी पतसंस्था गरुड झेप घेईल

चंद्रपूर : छोट्याशा बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून आर्थिक उन्नती करीत आज या बचत गटाचे रूपांतर महिला सहकारी पतसंस्थेत होत आहे. भविष्यात रणरागिनी महिला सहकारी पतसंस्था गरुड झेप घेईल. ही कौतुकास्पद वाटचाल असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
Ranragini Women's Cooperative Credit Union will take eagle leap
बाबूपेठ नेताजी चौक येथे रणरागिनी महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी नवनियुक्त गोंडवाना विद्यापीठाचे पदवीधर सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखडे यांचा सत्कार खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, लीलाताई पोटदुखे, प्राध्यापक वरंभे, पायपरे, नरेंद्र बोबडे, रणरागिणी महिला सहकारी पतसंस्था अध्यक्षा चंदा वैरागडे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या महिला बचत गटाच्या माध्यमातून व महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न होतील, अशा शुभेच्छा देखील खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक उन्नतीसाठी जो प्रयत्न झाला, तो भविष्यातही कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment