Ads

तान्हा पोळ्यातील लाठीचार्जची योग्य चौकशी करा

चंद्रपुर :-मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी काळात विविध शासकीय निर्बंध असल्याने आपल्या सण त्योहाराला मुकलेला समाज आज भीषण अश्या महामारीतून बाहेर पडत नियमानुसारच मोठ्या उत्साहात आप आपले सण त्योहार साजरेकरण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याने सण त्योहारात भीतीदायक वातावरण घडल्याचा प्रकार नंदीबैल पोळ्या दरम्यान शहरात घडला.
शहरातील नंदीबैल पोळ्याच्या व धार्मिक आस्थेचा ठिकाण म्हणजे बाजार चौकातील प्रसिद्ध महादेव मंदिर..!या परिसरात भरणारा तान्हा पोळा हा ब्रह्मपुरीकरांसाठी आकर्षणाचा विषय असतो येथे भरणाऱ्या तान्हा पोळ्याला जत्रेचे स्वरूप असते तान्हा पोळा निमित्य भरणारी जत्रा व येथे शहराच्या विविध भागातून येणारे मोठे नंदी यांची मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील लोक सहपरिवार उपस्थित राहत असल्याने मोठी गर्दी होत असते ब्रह्मपुरीत तान्हा पोळ्याला दरवर्षी शांततेत पार पडत असते.मागील दोन वर्षात कोरोनामुळे तान्हा पोळा भरविण्यात आला नाही तब्बल दोन वर्षानंतर कोरोना प्रतिबंध उठल्याने शहरातील लोकांनी या वर्षीच्या धुम्मनखेडा बाजार चौक महादेव मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सोशल मीडिया वर वायरल व्हिडिओ मध्ये या ठिकाणी मिरवणुकीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी लाटीचार्ज केल्याचे दिसून येत आहे.

धुम्मनखेडा बाजार चौक महादेव मंदिर परिसरात तान्हा पोळा हा कमी जागेत भरविल्या जात असल्याने मोठी गर्दी असते अत्यंत कमी जागेत असलेल्या व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा मागचे कारणांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाली पाहिजे गर्दीच्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्याने लोकांमध्ये भगदळ निर्माण झाली होती यात मोठा अनर्थ घडू शकला असता लाठीचार्ज करण्याचा पोलिसांकडे एकमेव पर्याय होता का ? ज्यांच्यामुळे लाठीचार्ज करावा लागला अश्यांवर पोलिसांनी काय कारवाई केली ? लाठीचार्ज चे आर्डर कोणी दिले ? कोणतीही सूचना न देता लाठीचार्ज झाल्याने भगदडी दरम्यान काही अनुचित प्रकार घडला असता तर त्यास जबाबदार कोण ? अशा आषयांचे निवेदन उप विभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे , मंगेश फटींग तालुका उपाध्यक्ष पंकज फुकटे, सचिन तलमले व इतर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक व
जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना पाठवले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment