Ads

गणेश भक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज

चंद्रपूर :- चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्ते व गणेश भक्तांवर लाठीमार करणाऱ्या एका पोलीस शिपायाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. शिवाय या प्रकरणाचे उपविभागीय पोलीस अधिका-यांमार्फतीने चौकशीचे आदेश दिले आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्ते व भक्तांवर लाठीमार करण्याची घटना काल शुक्रवारी चंद्रपूर शहरातील गणरायाला निरोप घेताना निघालेल्या मिरवणूकीदरम्यान शहरातील मुख्य मार्गावर घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे चंद्रपूरात गणरायाचे थाटात आगमण झाले. विविध मंडळांनी विविध देखाव्यांसह गणरायायाची आठवडाभर मनोभावे पूजाअर्चा केली. काल शुक्रवारी चंद्रपूर शहरातील गणेश मंडळांनी स्थापीत केलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व जय्यत तयारी केली. पोलिस प्रशासनानेही विसर्जन मिरवणूक रॅलीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी याकरीता जय्यत तयारी केली. त्यानंतर काल सायंकाळ पासून पोलीस बंदोबस्तात विसर्जन मिरवणूकीला सूरूवात झाली. गणेशाला निरोप देण्याकरीता निघालेली मिरवणूक रैली शहरातील जयंत टॉकीज चौकात पोहचली. त्यावेळी जटपुरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची मिरवणूक तिथे पोहचली. मात्र समोरील मंडळाला डावलून मागे असलेल्या गणेश मंडळाला पोलिसांनी पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. ह्याबाबत चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी अरेरावी करून वाद घातला असा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. ह्यामुळे वातावरण तंग झाले असता पोलिसांनी वरिष्ठांना कुठलीही माहिती न देता तसेच आदेश नसताना थेट चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्ते, गणेश भक्तांवर लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र गणेश भक्तांनी संयम बाळगत पुढची वाट धरली व जटपुरा गेट जवळ पोहचताच चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले व सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करून विनाकारण लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईस्तोवर इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली. ही घटना कळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आंदोलनस्थळी दाखल झाले व सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याचे आवाहन करून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली.

मात्र आंदोलनकर्त्या भक्तांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी रेटून धरली असता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचारी आदेश रामटेके याला निलंबित केले, व घडलेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक ह्यांना आदेश दिले. घटनास्थळी नेमके काय घडले ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी जयंत टॉकीज चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. अखेरीस चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेत विसर्जन सुरळीतपणे संपन्न होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेतल्याने विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पुढे निघाल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment