Ads

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या पुढाकाराने पाथ-वे स्वच्छता अभियानाची सुरुवात

चंद्रपुर:- काल स्वच्छता लीग निमित्त आयोजित स्वच्छता पदयात्रा कार्यक्रम संपन्न झाला, यात पठानपुरा गेट व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठानपुरा गेट भेट दिली होती. यादरम्यान इको-प्रो चे किल्ला स्वच्छता व नंतर भारतीय पुरातत्व विभाग यांनी किल्ला भिंतिस लागून बांधलेली संरक्षण भिंत व या दोन भिंति मधुन प्रस्तावित पाथवे सायकल ट्रेक ची माहिती जाणून घेतली होती.
Path-Way Swachhta Abhiyaan initiated by Collector Ajay Gulhane
पठानपुरा ते बिनबा गेट कांक्रीट रोड बांधकाम झाले असून अप्रोच चे काम बाकी आहे. तसेच किल्ल्यास लागून पुरातत्व विभागच्या संरक्षण भिंत मधून पाथ-वे काम अपुर्ण राहिले होते, आता मात्र पुन्हा झुडपे वाढली आहे तसेच या रोडच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढल्याने दृश्यता नाही आहे, पुरात्तव विभाग च्या रेलिंग चोरीला जात आहेत, आदि समस्या सोडविन्याच्या दॄष्टिने स्वच्छता अभियान राबविन्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांना मॉर्निंग वॉक व किल्ल्याच्या भिंति मधील पाथवे-सायकल ट्रैक वापरता यावे, हा मार्ग स्वच्छ व्हावा, पाथवे तयार व्हावा सदर अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केला, तसेच सदर कार्य श्रमदान मधून पूर्ण व्हावे, जनसहभाग असावा, याकरिता इको-प्रो ने पुढाकार घ्यावा, पालिका व विविध विभागचे कर्मचारी, सोबत विविध संस्थाना आव्हान करून पुढील पंधरा दिवसात हा नागरिकांनी वापरणे योग्य व्हावा यासाठी प्रयत्न करावे, प्रशासकीय स्तरावर आवश्यक सहकार्य करण्यात येईल अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार आजपासून सकाळच्या वेळेस अभियान सुरु करण्यात आले. या स्वच्छता मोहिंम करिता स्व:ता जिल्हाधिकारी पुढाकार घेतल्याने आज सकाळी इको-प्रो टीम सोबत महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी, महसूल विभाग अधिकारी-कर्मचारी अशी शंभर पेक्षा अधिक लोकांनी आज पठानपुरा ते विठोबा खिड़की मार्गातिल झुडपे, पाथवे स्वच्छ करण्यास श्रमदान केले.

आज सकाळी स्वच्छता अभियान मधे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट देत पठानपुरा ते विठोबा खिड़की पायी फिरून पाहणी केली व उपस्थित अधिकारी यांना आवश्यक सुचना दिल्या, यावेळी इको-प्रो चे बंडू धोतरे, मनपा उपायुक्त गऱ्हाठे, तहसीलदार नितिन गोंड़, नायब तहसिलदार राजू धांडे, डॉ अमोल शेळके, स्वच्छता अधिकारी, मड़ावी, भूपेश गोठे, उदय मैलारपवार, महेंद्र हजारे, पालिका आरोग्य विभाग, इको-प्रो आपातकालीन विभाग, पुरातत्व विभाग सदस्य, उद्यान विभाग आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

"चंद्रपूर शहर ऐतिहासिक असून, बरीच ऐतिहासिक वास्तु आहेत. किल्ला परकोट सोबतच पठानपुरा ते बिनबा गेट दरम्यान पुरातत्व विभाग ने बाँधलेल्या संरक्षण भिंत दरम्यान मॉर्निंग वॉक करिता पाथवे व सायकल ट्रैक शक्य असल्याने यासाठी स्वछता अभियान करिता विविध विभाग व नागरिकांनी श्रमदान करीत आवश्यक प्रशासकीय मदतीने कार्य झाल्यास नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉकला पर्याय व सोबतच ऐतिहासिक वारसा संवर्धनास हातभार लागू शकेल"

अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment