Ads

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज

चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सर्जनशील वृत्तीतून संशोधन निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी अत्यंत महत्वाची आहे. प्रशासकीय दृष्टीकोनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शाळा पातळीवरील विज्ञान प्रदर्शनीची अत्यंत महत्वाची ठरतात. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली उपकरणे व संशोधकवृत्ती यांचे प्रदर्शन करणारे एक व्यासपीठ उपलब्ध होत असते याच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.
पंचायत समिती , वरोरा ( शिक्षण विभाग ) अंतर्गत कर्मवीर विद्यालय , वरोरा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.Need of science exhibition for scientific attitude among students

यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ . विजयराव देवतळे, गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार, आनंद निकेतन महाविद्यालय , वरोरा येथील प्राचार्य डॉ . मृणाल काळे सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीकांत पाटील, सोनबाजी भोंगळे यांची उपस्थिती होती.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतील बक्षिण वितरण व समारोप सोहळा दि . 2 सप्टेंबर २०२२ वेळ दुपारी ३.०० वाजता होत आहे. बक्षिस वितरक ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे, तहसिलदार रोशन मकवाने - सोळंके, गोपाळराव एकरे, प्रकाशचंद मुथा, पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नरेंद्र बोरीकर, तुकाराम कुचनकर, ज्ञानेश्वर चहारे, सिमा राऊत, नामदेव राऊत यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment