Ads

दोनशेहून अधिक लोकांनी घेतली कर्करोग आजाराबाबत माहीती

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात काल दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ला मोफत कॅन्सर रोगनिदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती आणि योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद पालक मित्र मंडळ, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. तपासणी शिबिराकरिता मुख, स्तन, गर्भाशय कॅन्सरची तसेच मधुमेह, हेपीटायटस बी. सी., रक्तदाब आणि नेत्ररोगाची मोफत तपासणी करण्यात आली.More than two hundred people received information about cancer disease

मोफत तपासणी शिबिराकरिता प्रामुख्याने टाटा केअर प्रोग्रामचे डॉ. आशीष बारब्दे, डॉ. वैदही लोखंडे, डॉ. सुरज साळुंखे, अपर्णा चालूलकर, धम्मज्योती मुरमडकर, वनिता थुल, आरती भटेले आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अक्षय चव्हाण यांची उपस्थित होती.

कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरचे डॉ. आशीष बारब्दे यांनी कॅन्सर या आजाराविषयी उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. कॅन्सर कसा होतो, कॅन्सरच्या प्रकाराची माहितीही यावेळी देण्यात आली. लवकरात लवकर उपचार केले तर कॅन्सरसारखा आजार सुद्धा बरा होऊ शकतो. त्याकरिता कॅन्सर विषयीची जनजागृती माहिती असणे खूप गरजेचे आहे. असे डॉ. बारब्दे यांनी सांगितले.

डॉ. सुरज साळुंखे यांनी तंबाखू, गुटखा, खर्रा, बीडी, सिगारेट, दारूच्या सेवनाने शरीरावर काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये कोणते विषारी घटक असतात ज्यामुळे मानवी शरीराला कॅन्सर होऊ शकतो याची सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींना कोणतेही व्यसन करू नये आणि आपल्या पालकांना पण करू देऊ नये. त्यांना कॅन्सर आजाराविषयी माहिती द्यावी आणि पालकांची तपासणी करून घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले .

डॉ. वैदही लोखंडे यांनी मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कर्करोगाच्या लक्षणाविषयी, आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

मोफत कर्करोग निदान तपासणी आणि नेत्ररोग तपासणी शिबिरात लोकमत सखी मंच, महिला बचत गट नगरपालिका भद्रावती, पुरोगामी पत्रकार संघ, वर्चस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती, संघर्ष वाहन चालक-मालक संघटना, ग्राहक पंचायत भद्रावती, योद्धा संन्याशी विवेकानंद पालक मित्र मंडळ भद्रावती आणि भद्रावती शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाची उपायोजना आणि नियोजनासाठी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, पुरूषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, डॉ.रमेश पारेलवार, प्रा.अमोल ठाकरे, प्रविण रामचंद्र चिमुरकर, वसंत वऱ्हाटे, तनुगुलवार, किरन साळवी, प्रा.धनराज आस्वले, डॉ.सुहास तेलंग , डॉ.उत्तम घोसरे , डॉ.यशवंत घुमे, डॉ.प्रकाश तितरे, डॉ.विजय टोंगे, डॉ.बंडू जांभूळकर, डॉ.ज्योती राखुंडे,डॉ.जयवंत काकडे, डॉ.सुधीर आष्टुनकर, डॉ.संगिता बाबोळे, डॉ.गजानन खामनकर इत्यादिंनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment