Ads

शालिकराम नगर येथील अनेक युवकांचा काँग्रेस पार्टीत प्रवेश

चंद्रपुर :- चंद्रपुर येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुग्घुस येथील शालिकराम नगर व गांधी नगरच्या अनेक युवकांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला.Many youths from Shalikram Nagar joined the Congress party
नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने या युवकांचा पक्षप्रवेश काँग्रेससाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठया संख्येत अनेक युवकांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने कॉग्रेस बळकट झाली आहे. काँग्रेसच्या विचारधारेचा स्वीकार करून युवकांनी प्रवेश केला याचा आनंद होत आहे मी सर्व युवकांचे काँग्रेस पार्टीत स्वागत करतो असे मनोगत काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी राजकुमार वर्मा, विमल वर्मा, सुमन मेडसीली, तन्वीर बेग, राजेश उडीयार, कोमल बावरीया, वेंकटस्वामी तलांडे, निर्भय सिंग, साहिल शेख, सोहेल शेख, सानू शेख, शैलेश तलांडे, संजय वर्मा, मोनू शेख, अंकुश कैथल, प्रमोद वर्मा, कमलेश बावरीया, बबलू मातो, भारत बरगेला, चिंता सारवा, आकाश केसकर, श्रीनिवास मेडसीली, रोहित चंद्रवंशी, धम्मू सोनटक्के, राहुल त्रिकुटला, अज्जू शेख, अरमान प्रसाद, कासीम शेख, अमोद वर्मा, अनवरुल हक, अमीर खान, अजय वर्मा, आशिष ताकसांडे, नितेश केसकर या पक्षप्रवेशीतांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.

यावेळी घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, पवन नागपुरे, सुभाष तुमराम व हरीश जाधव उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment