Ads

बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी कोंबड्याच्या पिंजऱ्यात शिरला आणि अडकला

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-कोंबड्यांची शिकार करायला गेलेला बिबट खुराड्यात अडकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड येथील साई नगरात उघडकीस आली. येथील निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केला. तेथील काही कोंबड्यांना त्याने आपले भक्ष्य बनविले, यानंतर मात्र तो खुराड्यातच अडकला. घटनेची माहिती परिसरात हवेसारखी पसरली आणि भल्यापहाटे एकच खळबळ उडाली.
The leopard entered the hen house to trap the hen and got stuck in the house
बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याचे कळताच वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ५ वाजतापासून साडेदहा वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला पजऱ्यात जेरबंद केले. वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात सोडून  दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment