Ads

आदर्श शिक्षकांचा काँग्रेसकडून सन्मान चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन

चंद्रपूर : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शिक्षकांना ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी सन्मानित केले जाते. जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासनाकडून सत्कार कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. ५) शिक्षकदिनाचे औचित्य साधत शहरातील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Honored by Congress for exemplary teachers Organized by Chandrapur City District congress Committee
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. जिवनात काहीतरी वेगळे करण्यासाठी शिक्षण हेच एक महत्त्वपूर्ण साधन आहे. हे आपल्याला जीवनाच्या कठीण परिस्थितीत सामना करण्यास मदत करते. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेदरम्यान मिळविलेले ज्ञान प्रत्येक व्यक्तीला जीवनात स्वावलंबी बनवते. आपल्या मुलांना आणि देशातील तरुणांना यशाच्या दिशेने जाताना पाहायचे आहे, जे केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे.शिक्षणाचे वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. शिक्षण हे आपले जीवन आहे जे आपल्याला जगायला शिकवते. या सर्व प्रक्रियेत शिक्षकांची मोलाची भूमिका असते. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान व्हावा, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील सुशील पोरेड्डीवार, हरीश ससनकर, रजनी मोरे, अनिल पेटकर, स्मिता ठाकरे, श्याम धोपटे या सहा आदर्श शिक्षकांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, मनीष तिवारी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नरेंद्र बोबडे, पप्पू सिद्दीकी, कुणाल चहारे, राज यादव, राधिका बोहरा (तिवारी), रामकृष्ण कोंड्रा, राजू खजांची, कासिफ अली, केतन दुरसेलवार, विनोद वाघमारे उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment