Ads

काजळसर येथील गणपती विसर्जन ट्रक्टर झाला पलटी.

चिमूर :-तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ ची विसर्जन झाल्यावर मिरवणूकीतील भक्तगण परत येत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याची दुर्घटना घडली.यात एक महिला जागीच ठार झाली असून शाळाकरी मुली सह अनेक महिला जखमी झाल्या असून चिंताजणक रुग्णांची नागपूर रेफर करण्यात आले. दुर्घटनेत प्रेमीला गुलाब श्रीरामे वय (४० वर्ष) हिचा जागीच मृत्यू झाला.
Ganapati Visarjan tractor at KajalSir overturned.
काजळसर येथील सार्वजनिक गणेश मंडळ असून आज दि २४ ला विसर्जन मिरवणुकी द्वारे नवयुवक
गणेश मंडळ चे विसर्जन करण्यात आले.परत येत असताना ट्रॅक्टर च्या ट्रॉली त शाळाकरी मुली , महिला ,पुरुष बसून येत होते.ट्रॉली आवश्यक ते पेक्षा जास्त बसून होते.अचानक फॉरेस्ट नाक्याजवळ ट्रॅक्टर पलटी झाली. त्यामुळे ट्रॉली तील २७ जखमी झाले असून रेफर १५ करण्यात आले. गंभीर ३ जखमी असल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती पसरताच पोलीस प्रशासन घटनास्थळी जाऊन अंबुलन्स व्यवस्था करीत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. चिंताजनक जखमींना नागपूर रेफर करण्यात आले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुटल्यावर मुली गणपती विसर्जन ला गेल्या . त्यामुळे त्यांना जखमी व्हावे लागले.

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर चा तुटवडा असल्याने खाजगी डॉक्टर बोरकर व डॉ पाटील डॉ दिलीप शिवरकर डॉ बोढे, यांनी सुद्धा दवाखान्यात येऊन आपद प्रसंगी सेवा दिली.

घटनेची माहिती मिळताच भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर, शहर महामंत्री श्रेयश लाखे ,अमित जुमडे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे गोलू भरडकर ,भूषण सातपुते आदी कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मदत केली

ट्रॅक्टर मालक अमोल निकोडे व चालक नरेश पेटकुले यांच्या वर कार्यवाही करण्यात आली.पोलीस निरीक्षक मनोज गभने पुढील चौकशी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment