Ads

खगोल विज्ञान व फल ज्योतिष वास्तव व भ्रम या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम

चंद्रपूर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नागपूर येथे होणाऱ्या राज्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या अनुषंगाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात मानवी समाजातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धानां मूठमाती देण्याच्या उद्देशाने चंद्रपुर येथील मातोश्री विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ताडोबा रोड,तुकूम चंद्रपुर येथे तसेच विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय नागपूर रोड, चंद्रपुर येथील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर महा अंनिसचे खगोल विज्ञानाचे अभ्यासक मा शंकर शेलार साहेब यांनी खगोलशास्त्र विज्ञान आणि फलज्योतिष या विषयावरील वास्तविकता आणि त्यातील अंधश्रद्धा,भ्रम यावर पीपीटी च्या सहाय्याने सखोल विचारांचे मार्गदर्शन केले.Enlightenment Program on Astronomy and Fala Astrology Reality and Illusion
या कार्यक्रमात मातोश्री विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम रोक्कमवार तसेच विद्यानिकेतन येथे पी एम जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकेतून पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर श्रीमती संगीता मुंजे होत्या. या दोन्ही कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा प्रा सूर्यकांत खणके सर तसेच प्राचार्य आशिष कुमार झा हे अध्यक्ष म्हणुन लाभले.चंद्रपुर जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन पी एम जाधव महा अंनिस चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले तर उपरोक्त कार्यक्रमास अंनिस चंद्रपुर महानगर कार्याध्यक्ष सुनील रत्नाकर भोयर,अंनिस चे श्री शेलार साहेब, श्री बीजवे सर मुख्याध्यापक मातोश्री विद्यालय, अंनिस प्रकाशन विभागाचे राज्य सहकार्यवाह नवल ठाकरे सर्वश्री पिंपलशेंडे, चिलबुले , प्रवीण कडू आणि *मातोश्री विद्यालयातील 1000 च्या वरून विद्यार्थी तसेच विद्यानिकेतन शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथील 250 च्या वरून विद्यार्थी वर्ग तथा कर्मचारी यांची उपस्थित होती.कार्यक्रमाचे आभार पी एम रोक्कमवार व श्रीमती संगीता मुंजे यांनी मानले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment