Ads

बैठकीचे आयोजन करुन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील अडचणी दुर करा - आ. किशोर जोरगेवार

मुंबई :-चंद्रपूरला मंजुर झालेल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कामात विलंब होत आहे. त्यामुळे येथील नागरिक उत्तम आरोग्य सेवेपासुन वंचित आहे. ही बाब लक्षात घेत बैठकीचे आयोजन करुन येथे निर्माण होत असलेल्या समस्यांचे निराकरण करत सदर महाविद्यालय लवकरात लवकर रुग्णसेवेत रुजू करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना केली आहे.
आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील मंत्रालयात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेत सदर मागणी केली आहे. यावेळी ना. गिरीष महाजन यांनीही लवकरच याबाबत बैठकीचे आयोजन करण्यार असल्याचे मान्य केले आहे.

चंद्रपूर येथे अत्याधुनिक आरोग्य शिक्षण व व्यवस्था याकरिता शासनाने पागलबाबा वार्ड चंद्रपूर येथे नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले आहे. येथे इमारत बांधकाम व साधनसामुग्रीचा पुरवठा होत पर्यंत चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे कामकाज केले जात आहे. परंतु अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे काम पूर्ण झाले नसल्याने चंद्रपूर येथील नागरिक उत्तम वैद्यकीय सेवेपासून वंचित आहे. त्यातच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, ऑटोक्लेव, इको मशीन, इत्यादी अद्यावत वैद्यकीय उपकरणे येथे उपलब्ध नसल्याने उपचारा दरम्याण अडचणी येत आहेत.

सदर महाविद्यालयात कर्मचार्यांची रिक्त पदे आणि तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ नियुक्ती नसल्याने उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन व विस्तारीकरण अत्यावश्यक आहे. येथे ८ विषयांचे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता प्राप्त झाली असतांनाही १० विषयांचे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रस्तावित असून अद्यापही याला मान्यता मिळालेली नाही. येथील महाविद्यालयाचे बरेचसे काम उर्वरित असल्याने नागरिकांकरिता तसेच विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण करता आलेले नाही.
या सर्व बाबिंचा गांभिर्याने विचार करत रुग्णांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने अद्यावत उपकरणे, वैद्यकीय साहित्य, सर्वप्रकारच्या आजारावरील औषधे उपलब्धता, कर्मचारी रिक्त पदभरती, तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ नियुक्ती, महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन, विस्तारीकरण महाविद्यालयाचे उर्वरित इमारत बांधकाम व इतर अनुषंगिक काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे. यासोबतच मिनी मंत्रालय समजल्या जाण्या-या जिल्हा परिषदेच्या नविन ईमारतीच्या बांधकामाकडेही योवेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. गिरीष महाजन यांचे लक्ष वेधले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment