Ads

वाढदिवसा निमित्ताने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

भद्रावती :-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील परमपूज्य श्री मंगेशजी महाराज यांच्या वाढदिवसा निमीत्तांनी शिक्षकांचा सत्कार व गरजु विद्यार्थांना शालेय साहीत्याचे वितरण व खाऊ वाटप पंडीत सतिश गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले.
Distribution of school materials to needy students on the occasion of birthday शाळा ही विद्यार्थांना ज्ञानदान करणारी त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी कींबहुना त्याचे जीवन घडवीनारी एक सामाजिक संस्था असते म्हणुनस शाळा आणि शिक्षक यांचे ऋण मनुष्य कधीही विसरु शकत नाही ते फेडण्याचे वेग वेगळे मार्ग आहेत अशातलाच एक मार्ग निवडुन भद्रावती तालुक्यातील चिंताहरन कपिश्वर देवस्थान चंदनखेडा ( खोकरी ) येथील मा.मंगेश महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन चंदनखेडा,चंदनखेडा मकक्ता,चरूर(धा.),खोकरी,बेलगाव परीसरातील एकुण शाळेतील ५०० विद्यार्थांन्ना नोटबुक, पेन, पेन्सील, फळे मिठाई वाटुन वाढदीवस साजरा केला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते,दशरथजी ठावरी,पकाशजी कंगाले गुरूजी,पंदरेजी साहेब,गोपाल गोंगल, बाळासाहेब पडवे , ज्ञानेश्वर चौधरी,प्रदिप बदकी,हर्षल महाले,मनोज महाले व गणेश बुजाडे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment