Ads

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

मुल :- मुल तालुक्यातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या फुलझरी येथील डोनी जंगलात गुन्हे चराईसाठी नेलेल्या गुहाख्याला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ११ सप्टे. २०२२ ला सकाळी ११.३० वाजता घडली. Wild animals
Cowherd seriously injured in tiger attack
फुलझरी येथील रहिवासी असलेला किसन आबाजी वसाके (४९) असे जखमी गुहाख्याचे नाव आहे. सदर घटना डोनी बिट ३ कक्ष क्रमांक ३६० मध्ये घडली. नेहमीप्रमाणे जंगलात गुन्हे चराईसाठी नेले असता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच लगेच वनरक्षक बोरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमी गुहाख्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वन विभागाकडून जखमी रुग्णाला तात्काळ १०,००० /- मदत देण्यात आली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment