Ads

मानवाच्या सर्वांगीण विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे -रोहन घुगे उपविभागीय अधिकारी

चंद्रपूर : समाजातील अभियंत्याचे स्थान तसेच महत्त्व व योगदान यावर प्रकाश टाकत स्पर्धा परीक्षा,राजकारण,समाजकारण,विज्ञान तसेच प्रत्येक क्षेत्रात अभियंत्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे.म्हणूनच मानवाच्या सर्वांगीण विकसामध्ये अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी मा.रोहन घुगे त्यांनी व्यक्त केले ते ग्रॅज्युएट इंजिनिअर असोसिएशन (GEA) तर्फे आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात बोलत होते.Contribution of engineers to overall development of human being is valuableRohan Ghuge Sub Divisional Officer
भारतात अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा पाया घालणारे महान अभियंते, भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जाणारा अभियंता दिन या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता मदन अहिरकर तर मुख्य अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी रोहन घुगे तसेच प्रमुख पाहुणे उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर, प्रभारी उपमुख्य अभियंता अनिल फुनसे, जी.ई.एचे पदाधिकारी रवींद्र जांगिलवार, परेश इटकळकर, सुशील लांबट यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला प्रशासकीय कामास्तव हजर राहू न शकलेले कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी महानिर्मितीचे प्रकल्प संचालक संजय मारुडकर व कार्यकारी संचालक- (O&M-II) पंकज सपाटे यांनी संदेश पाठवून सर्व अभियंत्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून हेमंत साडमके यांच्या गाण्याने व गिटार वादनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ग्रॅज्युएट इंजिनिअर असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र जांगिलवार व सचिव सुशील लांबट यांनी संघटनेची कार्यपद्धती व संकल्पना याबद्दल माहिती दिली.निलेश भोळे ह्यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांवर पॉवरपॉइंट सादरीकरण केले.उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर यांनी अभियंता व त्याची सामाजिक बांधिलकी याबद्दल मार्गदर्शन केले.मकरंद परदेशी यांनी मुख्य अतिथी रोहन घुगे यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अल्प-परिचय करून दिला.याप्रसंगी निवृत्त होणाऱ्या उपमुख्य अभियंता राजगडकर तसेच कार्यकारी अभियंता राजेश महाजन यांच्या महानिर्मितीतील प्रदीर्घ सेवा कार्यकाळाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला .
"प्लास्टिक दूर करा" या पर्यावरणवादी विचाराचा पुरस्कार करून संघटनेने बनवलेल्या सर्व सभासदाकरिता दैनंदिन उपयोगी अश्या प्लॅस्टिकमुक्त पिशव्यांचे याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते अनावरण व वितरण करण्यात आले तसेच मोबाईल एप्लीकेशनची (Android Apps) चे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याची माहिती मयुर पांडे यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात मुख्य अभियंता मदन अहीरकर यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जीवनपटाबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन करताना अभियंत्याने चौकटीबाहेर विचार करून काम केलं पाहिजे असे मत व्यक्त करून संघटनेच्या कामाबद्दल गौरवोदगार काढले.
याकार्यक्रमाच्या वेळी मानवी जीवन सुकर करण्यामध्ये अभियंत्याच्या योगदानाचा उहापोह करण्यात आला. कोराडी ,खापरखेडा,पारस ,नाशिक तसेच डींभे येथील संघटनेचे प्रतिनिधी समवेत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात 300 अभियंत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर येथे हा कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज आमले व अंकिता सिंग यांनी केले तर मकरंद परदेशी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल असावा,विजयसिंह राठोड,जयंत वंजारी,रवी बोबडे,गुरुपाल गायधने,विशाल जामकर, सुदीप गुठे,रोशन लोये व सर्व पदाधिकारी,सभासदांनी प्रयत्न केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment