Ads

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात चंद्रपुर महिला काँग्रेस आक्रमक

चंद्रपुर :-केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी हे चंद्रपूर च्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारने सतत पेट्रोल, डिझेल, गॅस यात दरवाढ केल्या मूळे सामान्य लोकांचे महागाई मुळे जगणे कठीण झाले आहे. याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप करत चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण कडून हरदीप सिंग पुरी यांचा त्यांच्या मार्गावर ठिय्या निषेध करण्यात आला.
Hardeep Singh Puri Union Minister of Petroleum and Natural Gas
Chandrapur Mahila Congress aggressive agitation against petrol, diesel, gas price hike
चंद्रपूर लोकसभेची जबाबदारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भेटी गाठी घेणार आहेत. याचाच निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीण च्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात महिला काँग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आले.

पुरी हे पेट्रोलियम मंत्री आहेत पण पेट्रोल, डिझेल चे दर कमी राहावे म्हणून त्यांनी काहीही प्रयत्न केले नाही उलट भाजपला फक्त निवडणूक दिसते. गोरगरीब जनता दिसत नाही, भाजपा हे एक इलेक्शन मशीन आहे. आता सुद्धा लोकसभा निवडणुक डोळ्या समोर ठेऊन पुरी चंद्रपूरात आले आहेत यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधता येतो पण सामान्य लोकांशी नाही. असा आरोप यावेळी नम्रता ठेमस्कर यांनी केला. यावेळी उपस्थित महिलांनी महागाई विरोधात घोषणा दिल्या. तसेच फलक हातात घेऊन पुरी यांचा निषेध केला. हरदिप पुरी गो बॅक, हरदीप पुरी वापस जाओ, मेहंगाई कम करो वरना कुर्सी खाली करो अशा घोषणा दिल्या.Hardeep Puri go back, Hardeep Puri go back, reduce Price  hike or lower the chair..

या वेळी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन च्या शहर अध्यक्ष शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, अनुसूचित विभाग महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष शालिनी भगत, सीमा धुर्वे, मंगला शिवरकर, किरण वानखेडे, मीनाक्षी गुजरकर, मेहेक सय्यद, मुन्ना तावाडे, प्रतीक दुर्योधन, मोबिन सय्यद यांची उपस्थिती होती.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment