Ads

भिम आर्मीचा माजी जिल्हा उपाध्यक्ष शुभम गवई वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

वरोरा(प्रती):- एका मेडिकलमध्ये काम करणाऱ्या फार्मासिस्ट महिलेचा विनयभंग करणाऱ्या भिमआर्मीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला आज वरोरा पोलिसांनी अटक केली.
A case of molestation has been registered against Shubham Gavai.
वरोरा येथील टिळक वॉर्डात अस्थीरोग तज्ञ डॉक्टरचे हॉस्पिटल आहे आणि त्याच्या बाजूला त्यांची फार्मसी आहे,याच फार्मसी मध्ये एक महिला फार्मासिस्ट म्हणून काम करते, दि,५/९/२०२२रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शुभम गवई हा गोळ्या घेण्याच्या बहाण्याने मेडिकल मध्ये गेला असता, सदर महिलेला पाहून अश्लील इशारे करायला लागला ,तू माझ्याशी मैत्री कर,, मला fb वर फ्रेड रिकवेस्ट पाठव, तुझ्या नवऱ्याला सांगू नको असे बोलू लागला, मी भिमआर्मी वाला आहे, माझे कोणीच काही बिघडू शकत नाही,या प्रकरणी सदर महिलेने पोलिसात धाव घेऊन आरोपी शुभम विरोधात तक्रार दाखल केली, असता, आरोपी शुभम वर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, आरोपीला आज दुपारच्या सुमारास एका बार मधून अटक करण्यात आली आणि जमीनारवर सुटका सुद्धा करण्यात आली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment