Ads

अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने घेतली पल्याडची दखल

चंद्रपुर :-मागील बन्याच दिवसापासून अनेक राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले ल्या 'पल्याड' Palayadया मराठी चित्रपटाची दखल अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने घेतली आहे. दरवर्षी श्रीमंताच्या श्रीमंतीची यादी जाहीर करणाऱ्या फोर्ब्सने आपल्या मॅगझिनमध्ये दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे ह्यांची मुलाखत घेवून संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयी माहिती त्याच्या मॅगझिन आणि ऑनलाइन पोर्टलवर छापुन आणली आहे.America's world-famous Forbes magazine took notice of film Palayad
पहिल्यांदाच फोर्ब्स Forbes magazine सारख्या जग प्रसिद्ध मॅगझिन एखाद्या मराठी चित्रपटाविषयी छापून आणणे हे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्ठीसाठी मानाच्या मुजरा आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका आणिआजूबाजूच्या गावात झाले असून २५ दिवसांमध्ये चित्रीकरण झाले आहे.. चंद्रपूर मधील व्हिजनरी व्यवसायीक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाइफ आणि लावण्यप्रिया आर्टसच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून के सेरा सेरा या डीस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या ४ नोव्हेंबरला 'पल्याड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'पल्याड' ने आजवर १२ वा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल नवी दिल्ली, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सिक्कीम, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबई, नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हल, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कोलकाता, कोकण मराठी चित्रपट महोत्सव, या चित्रपट महोत्सवामध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. पाखेरीज सिनेक्वेस्ट की आर अँड फिल्म फेस्टिव्हल युएसए, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया टोरटो, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, इंटरनॅशनल कॉस्मोपॉलिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हॉंगकॉंग, बॉयडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन आणि रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युसए मध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते शशांक शेंडे आणि देविका दफ्तरदार सोबत बल्लारशहा मधील बाल कलाकार रुचित निनावे तसेच नागपूरचे देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी चंद्रपूर मधील स्थानिक सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते आणि मुबईमधील अभिनेते गणेश कांबळे आदी कलाकाराच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यानी लिहिली असून, सुदर्शन खड़ागळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. रवींद्र शालीकराव वांढरे, गौरव कुमार बनिता पाटील, शिवशंकर रवींद्रनाथ निमजे, माया विलास निनावे, लक्ष्मण रवींद्रनाथ निमजे आणि रोशनसिंग बघेल हे चीत्रपटाचे सहनिर्माते आहेत. गीतकार प्रशांत मडपुवार आणि अरुण सांगोळे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, सॅम ए. आर., जगदीश गोमिला आणि तुषार पारगावकर यांनी स्वरसाज चढवला आहे. अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिका भिडे, सुस्मिरता डावलकर आणि केतन पटवर्धन यांनी आपल्या सुरेल गायनाद्वारे गीतामधील शब्दांना अचूक न्याय दिला आहे. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे आणि लोकेश कनिधी यांनी दिलं आहे. डि.ओपी मोहर माटे यांची सुरेख सिनेमॅटोग्राफी आणि मनीष शिर्के यांनी केलेल संकलन प्रेक्षकांना भावणारं आहे. स्वप्नील धर्माधिकारी यांनी रंगभूषा केली असून, विकास चहारे यानी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन अनिकेत परसावार यांनी केलं आहे, तर गिरीश रामटेके यांनी ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळली आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment