Ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला राज्यघटना लाभली. त्यांच्यामुळे आपल्याला मोठी संवैधानिक पदे देखील प्राप्त करता आली. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे शिक्षण घेता आले. परंतु आधुनिक भारतात आपण जीवन जगात असताना आजच्या पिढीला किंवा एकूणच भारतीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरंच कळले काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो.आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीचे त्यांचे कार्य भारतीय जनतेला न कळल्यामुळे भारतीयांची हानीच झालेली आहे.त्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आपल्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य शिकविले जाणे आवश्यक आहे.म्हणून इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात, विशेषतः बालभारती तसेच युवक भारतीच्या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र शिकविण्यात याकरिता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणमंत्री केसरकर यांनी तात्काळ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ( एस. सी. ई आर टी) या संस्थेच्या संचालकाला अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.

Biography of Dr. Babasaheb Ambedkar to be included in school curriculum
यावेळी त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना खालील बाबींचा अभ्यासक्रमात प्रामुख्याने समावेश करावा अशी देखील विनंती केली. त्यात डॉ. बाबासाहेबांचे चरित्र, ऐतिहासिक कार्य, विविध क्षेत्रातील संघर्ष, सशक्त भारत निर्मितीसाठीचे कार्य, महिलांच्या उन्नतीसाठी योगदान, ल़ोकशाही मजबुतीसाठी योगदान, तळागाळातील घटकांसाठीचे योगदान, आधुनिक भारत निर्मितीसाठी धरण निर्मिती, उद्योग व शेतीसाठी पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष, भारतीय संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान व आपले संविधान,डॉ. बाबासाहेबांचे समाज सुधारणाविषयक विचार, आर्थिक सुधारणा विषयक विचार तसेच अन्य विषयांचा समावेश शालेय पुस्तकात कराव. बालभारती तसेच इतिहासाच्या पुस्तकात अनिवार्यपणे त्याचा समावेश व्हावा.आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. हि मागणी रास्त असून तात्काळ अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

खासगी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्याकरिता बैठक घेणार : शिक्षणमंत्री

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना खासगी शाळेतील शिक्षकांचे वेतन व भत्ते अल्प असून त्यांच्या विविध समस्यांबाबत त्यांना सांगितले. यावे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्यासोबतच एक राज्य एक अभ्यासक्रम आणि एक जिल्हा एक गणवेश धोरण राबविण्याबाबत देखील सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या वेतनात वाढ करण्याचे देखील आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment