Ads

बांबु ही रोजगार देणारी हिरवी सुवर्ण काठी - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-हस्त कलेतील कलाकारांनी बांबूपासुन तयार होणाऱ्या वस्तूंवर आपल्या कलेची छाप सोडत या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याची व्याप्ती आणखी वाढविण्याची गरजेचे आहे. वन विभागाने याबाबत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करत बांबु पासुन तयार होणाऱ्या वस्तुंच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे. बांबु ही रोजगार देणारी हिरवी सुवर्ण काठी असुन याकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Bamboo is a green gold rod that employed. Teenagers
जागतिक बांबु दिनानिमित्त महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, नागपूर व चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर अंतर्गत बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली द्वारा सिद्धांत सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, बांबु प्रशिक्षण केंद्राचे अविनाश कुमार, वनपरिक्षेत्र अधिकारी मल्लेरवार यांच्यासह ईतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, मानव जन्माला आल्यापासुन त्याच्या शेवटापर्यंत बांबुचा संबंध त्याच्या जीवनात येत असतो. त्यामुळे मानवी जिवनात बांबुचे विशेष महत्व आहे. आधी बांबुच्या काही ठराविक वस्तु बनविल्या जात होत्या. मात्र आता हस्तकला विकसित झाली आहे. बांबु पासुन स्वस्त आणि टिकाऊ अशा सुंदर वस्तु आज बाजारपेठेत उपलब्ध आहे. असे असले तरी या वस्तुंना योग्य आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध नाही ही सुध्दा वस्तुस्थिती आहे. या दिशेने वन विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. याबाबच्या प्रशिक्षणाचा वेग वाढविल्या गेला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

आज एकाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट होते. तेव्हा बांबुपासुन तयार झालेला तिरंगा ध्वज आणि डायरी त्यांना भेट स्वरुपात देतांना आम्हाला आनंद वाटतो. अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या टेबलावर हा ध्वज दिसतो तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. मात्र आता यात आणखी वेगवेगळे प्रयोग करुन विभिन्नता आणत या वस्तुंकडे लोकांना आकर्षित करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. यातुन स्वयंरोजगार निमिर्ती होऊ शकते. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर करावा, बांबूपासून आर्थिक क्षमता वाढावी, यासाठी प्रत्येकाने बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा दररोजच्या वापरात उपयोग करावा तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक बांबू दिवस साजरा करण्याचा उद्देश सफल होईल असे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला वनकर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment