Ads

विरोधाच्या राजकारणात ब्रम्हपुरीत विघ्नहर्त्याचे आगमन

ब्रम्हपुरी :-कोरोना महामारी नंतर निर्बंध शिथिल होतं जनजीवन पुर्वपदावर येत असल्याने दोन वर्षानंतर गणपती आगमनाला मोठ्या उत्साहात सर्व भाविकांनी तयारी केलेली आहे तर शहरातील पारंपरिक गणेश मंडळानी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जल्लोषात तयारी केली मात्र उत्साही त्योहाराला राजकारण्याच्या राजकारणाने बाप्पाच्या आगमनाला खंडित करू पाहण्याचे स्वप्न धुळीस मिळाले व बाप्पाचे शहरात मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ब्रम्हपुरी तर्फे मंडळाचे अध्यक्ष श्रीमती रशमीताई पेशने व संयोजक तरंग खानोरकर यांनी मंगळवारला घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये सांगितले की ,मंडळाने श्री गणेशाची स्थापना, झाकी व मिनाबाजार भरवण्याचे ठरविले . पाण्याच्या टाकीजवळ जागा अपुरी पडु शकते या अंदाजाने दर्शनाला उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करुन मंडळाने लगतच असलेल्या वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीसर ( जुने ने.ही. कॉलेज ग्राउंड ) या जागेवर नगर परीषद ब्रम्हपुरीला दि . २८/०६/२०२२ गणेश उत्सव व आनंद मेला साजरा करण्याची परवानगी मागितली परंतु नगर परीषद ब्रम्हपुरीने सदर ग्राउंड न.प. ब्रम्हपुरी क्षेत्रातील सिनीयर सीटीझन व नागरीक यांना फिरण्याकरीता तसेच युवावर्ग यांना खेळण्याकरीता राखीव असल्याचे कारण देत परवानगी नाकारली नंतर दि .०३ / ०८ / २०२२ ला याच ग्राउंड वर मेला व मिनी सर्कस/मिना बाजार आयोजीत करण्याकरीता जाहीर लिलाव केला. सदर ग्राउंडची जागा ही महसुल विभागाची असुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी न.प. ब्रम्हपुरी ला अभिहस्तांकीत केलेली आहे.अशा जागेचा जाहीर लिलाव करण्याचे अधिकार फक्त मा. जिल्हाधिकारी यांनाच आहेत असे असतांना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध लिलाव केला. हे हेतुपूरस्पर कारस्थान इथवरच न थांबवता नगराध्यक्षा ब्रम्हपुरी यांनी ब्रम्हपुरी येथील दोन गणेशोत्सव मध्ये लागणाऱ्या आनंदमेला ला परवानगी नाकारण्यात यावी असा प्रस्ताव सुद्धा न.प. स्थायी समीतीच्या दि .१० / ०८ / २०२२ च्या मिटींगमध्ये ठेवला . त्यामध्ये ब्रम्हपुरीचे नगराध्यक्षा यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले परंतु काही सत्तारुढ नगरसेवकांनी शहरात कितीही आनंदमेला लागले तरी चालेल परंतु दोन्ही महत्वाचे आनंदमेले ब्रम्हपुरीचे शान आहेत व ही गौरवशाली परंपरा कुठल्याही परीस्थितीत खंडीत होवु नये अशी ठाम भुमीका मांडत हा ठराव रद्द केला.

परंतु नगराध्यक्षांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधात जात ही गौरवशाली परंपरा खंडीत करण्याकरीता स्वतःच्या पदाचा अधिकार वापरुन मा.जिल्हाधिकारी , चंद्रपुर यांचे कडे कलम ३०८ नुसार मा.जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार या दोन्ही आनंदमेल्यांना परवानगी देण्यात येवु नये अशी अपील केली. मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थायी समितीच्या सर्व लोकांना सुनावणीकरीता दि .२२ / ०८ / २०२२ ला मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावुन घेतले व सर्वाचे म्हणने ऐकुन घेतल्यावर त्यांनी हा प्रस्ताव रद्द केला व दोन्ही आनंद मेल्याची परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला.

ब्रम्हपुरी एकंदरीत वरील घटनाक्रम बघितल्यावर एक गोष्ट निश्चित पणे लक्षात येते की , नगराध्यक्ष यांनी हेतुपूरस्पर हे कृत्य केले असुन या दोन्ही गणेशोत्सवाची गौरवशाली अखंडीत परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न करण्याचे घृणास्पद कार्य केले आहे. ब्रम्हपुरीतील जनतेला बाप्पाच्या आगमनातील अडथळे माहिती होण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे सांगत श्रीमती रशमीताई पेशने व तरंग खानोरकर यांनी मंडळाच्या वतीने ब्रम्हपुरी न.प. नगराध्यक्षांच्या या कृतीचा जाहीर निषेध केलेला आहे. तर या संबंधित विषयाचे संपूर्ण विश्लेषणात्मक असलेले लेख पत्रकाद्वारे ब्रम्हपुरी शहरात घरोघरी व वृत्तपत्रातून वाटप केले गेले असल्याने शहरात सदर घटनेची विविध प्रकारे खमंग चर्चा सुरु आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment