Ads

उर्जानगरात मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापनदिन साजरा

ऊर्जानगर(चंद्रपूर):-मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, शाखा ऊर्जानगर यांच्या वतीने मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुरेश अडवे तर प्रमुख पाहुणे मा.अविनाश चव्हाण अध्यक्ष म से संघ ऊर्जानगर ,पुंडलिक आरिकर तसेच सत्कारमूर्ती मा.राजेंद्र पवार उत्कृष्ठ व्याख्याते,लेखक व सौ.सविता पवार यांची उपस्थिती होती.मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच पुष्पहार वाहून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.32nd Anniversary of Maratha Seva Sangh celebrated in Urjanagar
या कार्यक्रमात महानिर्मिती कंपनीत प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले सत्कारमूर्ती मा.राजेंद्र पवार यांचा सपत्निक सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी सत्काराप्रसंगी जयंत देठे,शितल चव्हाण,देवराव कोंडेकर,वनिता मत्ते, भोयर यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती मा राजेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या सत्काराबद्दल आम्ही आयोजकांचे सहृदय आभारी आहोत. अनेक संघटनांचा अभ्यास करूनच आम्ही म से संशी जुळलो तेव्हा ती एक संघटना होती, आज तो एक विचार झाला आहे. लोखंडाचं सोनं करणारा परिस जगात कोणी बघितला की नाही माहीत नाही, परंतु मसेसं च्या विचारांचा स्पर्श झालेल्या प्रत्येक घटकाचं त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांच्या प्रमाणात जीवनाचं निश्चितच सोनं झालेलं आहे.आम्हा सर्वांचं जीवन सुवर्णमय करणारे मसेसंचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर सरांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच डॉ. आ.ह. सरांचा सहवास व मार्गदर्शन जास्त काळ लाभल्याने वैचारिक बैठक बऱ्याच प्रमाणात पक्की झाली.आपण सर्व जोमानं काम करीत राहू, हाच निर्धार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. यावेळी उर्जानरातील जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या तथा मराठी चित्रपट कलाकार सायली देठे यांचा पल्याड चित्रपट प्रदर्शित होत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अविनाश चव्हाण यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याची व पुढील वाटचालीची माहिती दिली. सूत्रसंचालन संजय जुनारे यांनी केले तर आभार सतिश पाटील यांनी मानले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment