Ads

जुन्या वैमनस्यातून भद्रावतीत एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून

भद्रावती (जावेद शेख): - काही वर्षांपूर्वी एकाने मित्राच्या नातेवाईकांची हत्या केली होती मात्र अनेक वर्षांनी हा वाद पुन्हा उफाळत भद्रावती येथील पिपरबोडी गावात हत्येचा थरार घडला
MURDER
विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी रविवार 28 ऑगस्टला विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हे चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आले होते. Chandrapur crime रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास 30 वर्षीय सूरज शंकर शेट्टी या युवकांवर राजू शेट्टी याने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सूरज चा जागीच मृत्यू झाला. sharp weapon हत्ये आधी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती घटनास्थळी दाखल झाले. पोलीस स्टेशन भद्रावती  येथे 302 चा गुन्हा दाखल केला. 
आरोपी फरार असून ,आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनचे चार पथक तयार करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरु आहे . पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment