Ads

दूचाकी स्लीप होवून रस्त्यावर पडलेल्या युवकाला ट्रकने चिरडले

घुग्घुस: शास्त्रीनगर येथून घुग्घूस बस स्टॉप येथेदुचाकीने तिघे जाताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही खाली कोसळले. घुग्घूस कडून वणीकडे जाणाऱ्या वाहनाने एकास चिरडल्याची आज शनिवारी घुग्घूस येथे घडली.
या घटनेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी राजीव रतन चौकात मृतदेह सोबत घेवून रात्री साडेसातच्या सुमारास चक्काजाम करण्यात आला.

young man fell on the road and was crushed by a truck
फिर्यादी पेतरस रमेश चिलकावर (22) वर्ष रा. शास्त्रीनगर घुग्घूस यांनी पोलीस स्टेशन येथे दिली त्याच्या बयानावरून आज दुपारी 2 वाजता दरम्यान अरबाज शेख (21) वर्ष, विनय बरे (17) वर्ष व पेतरस चिलकावार (22) वर्ष असे तिघे शास्त्रीनगर येथून दुचाकीने अरबाज शेख याला बस स्टॉपवर सोडण्याकरीता जात असताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही खाली कोसळले त्यावेळेस राजीव रतन चौकाकडून येणाऱ्या MH 27 C 407 ट्रकने धडक दिल्याने अरबाज याच्या पोटाला तर विनय याच्या हाताला मार लागला.अरबाज याला ताबडतोब उपचारासाठी हलविले परंतु त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रात्री साडेसातच्या सुमारास संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर आणून राजीव रतन चौकात चक्काजाम
Jam in the square केला. शहरात उडाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय रेल्वेगेट वेळोवेळी बंद होत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. त्यामुळेच या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment