Ads

तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन. थकित मानधन त्वरीत देण्याची मागणी.Work stoppage movement of Gram Panchayat computer operators in the taluka.Demand for speedy payment of arrears.

भद्रावती :-चार महिण्यांचे थकित असलेले मानधन अद्याप मिळाले नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत काम करीत असलेल्या संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे,परीणामी जोपर्यंत हे थकित मानधन मिळत नाही तोपर्यंत या संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. 
या आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावित झाले आहे. हे थकित मानधन त्वरीत मिळावे यासाठी सदर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्य करणारे संगणक परिचालक हे शासनाच्या डिजिटल राज्य संकल्पनेतील प्रमुख दुवा आहे. अगदी तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी आपली जबाबदारी सांभाळत आहे मात्र हे मानधनही त्यांना दर महिन्याला मिळत नसल्याने त्यांना जिवन जगने असह्य झाले आहे. त्यामुळे त्यांना नाईलाजाने आंदोलन सुरु करावे लागले.यापुर्वी निवेदन देण्या आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे संघटनेच्या मनीष बलकी यांनी सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment