Ads

नाकीबंदी दरम्यान अवैध विदेशी दारू वाहतूक करताना दुचाकीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - मोटर सायकल वर दोन खाकी रंगाच्या मोठ्या खोक्यात विदेशी दारू वाहतूक करीत असताना दुचाकीसह दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
transporting illegal foreign liquor
सविस्तर वृत्त असे की, दुपारला पाच वाजताच्या दरम्यान सिंदेवाही शहरात पोलिसांनी नाकेबंदी केली असता वाहतूक शिपाई संजीव गेडेकर यांना सदरील मार्गावरुन मोटरसायकलवर दोन खाकी रंगाच्या खोक्यात काय तरी संशय रीत्या दिसत होते . त्या सदरील मोटर सायकल ला थांबवून वाहतूक शिपाई यांनी त्या मोटरसायकल चालकाचे तसेच मोटरसायकलचे झडती घेतले असता त्यात खाकी रंगाच्या खोक्यात विदेशी दारू वाईन ही 24 नग. व दुसऱ्या खोक्यात इंग्लिश बियर ह्यावर्ड्स कंपनीच्या भरलेले आढळून आले असता दोन आरोपी सह त्यांच्या ताब्यातील असलेले मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी 1)रवींद्र आडे वय- 42 आरोपी 2)विनोद मारबते वय - 40 राहणार मरेगाव तालुका सिंदेवाही या आरोपीवर सिंदेवाही पोलिसांनी कलम 65 (अ),83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पीएसआय ढोके यांनी केली असुन पुढील तपास सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शना सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment