Ads

ऊर्जानगरात आगस्ट क्रांतीपर्वनिमित्य क्रांतिवीरांना वाहिली श्रद्धांजली..

चंद्रपूर (ऊर्जानगर):- चातुर्मासाच्या कार्यक्रमात राष्ट्रसंतांनी " झाड झडुले शस्त्र बनेंगे,भक्त बनेगी सेना l पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे"ll या भजनाने चिमुरकराच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. १६ ऑगस्ट १९४२ ला प्रचंड उद्रेकासह चिमूर वासियांनी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयावर मुक मोर्च्या नेला. इंग्रजाच्या संगिनीला व बंदुकीच्या गोळीला न जुमानता चिमूर वासियांनी चिमुरला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. अशा प्रकारे १६,१७ व १८ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस इंग्रजाच्या गुलामगिरीतून संपूर्ण स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर होय . चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा नेताजी सुभाष सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली व संपूर्ण जगात चिमूरचे नाव अमर झाले.
सन 1942 च्या चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतीचे जनक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा सदर क्रांतीत समावेश असलेल्या क्रांतिवीरांच्या त्यागाची, बलिदानाची आपल्याला व येणाऱ्या नवीन पिढीला आठवण राहावी, त्यांच्या विचारांचे पुनः बीजारोपण व्हावे या हेतूने श्री गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास उगे माजी सचिव तथा उपाध्यक्ष राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद चंद्रपूर हे होते. उदघाटक मा सुहास जाधव साहेब उपमुख्य अभियंता प्रशासन चंद्रपूर विज केंद्र,प्रमुख वक्ते मा. दयाराम ननावरे सेवानिवृत्त हिवताप अधिकारी,नाना बावणे तसेच प्रमुख अतिथी मा. दिनेश चौधरी साहेब अधीक्षक अभियंता चंद्रपूर विज केंद्र,माजी अध्यक्ष भाऊराव बावणे, महिला सचिव अर्चना गोहणे यांची उपस्थिती होती.अधिष्ठानाला तसेच वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्ते मा.दयाराम नन्नावरे यांनी राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्य लढ्यामधील योगदान आणि 16 ऑगस्ट 1942 च्या चिमूर ऑगस्ट क्रांतीचा घटनाक्रम अभ्यासपूर्ण विषद केला.तसेच समाज घडवण्यासाठी तुकडोजी महाराजींनी केलेल्या विविध कार्याचे सखोल विश्लेषण केले. मा. दिनेश चौधरी साहेब यांनी समाजामध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा, रूढी, परंपरा बेरोजगारी याविषयी राष्ट्रसंतांचे विचार व त्यांनी केलेले कार्य कसे मात करू शकतात हे अभ्यासपुर्ण शैलीने मांडले.अध्यक्ष मा विलास उगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून ऑगस्ट क्रांतीचे सविस्तर असे वर्णन करुन ही क्रांती भारत स्वातंत्र्यमध्ये किती महत्वाची होती याची माहिती त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचना मधून दिली.
याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळातील सदस्यांच्या ईयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रज्योनी दरेकर,भाग्यश्री खाडे,आयुष्य उगे,हर्ष गोहणे,श्रेयश हेडावू यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख मधुकर दुफारे यांचे चिरंजीव प्रथमेश याचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने कार्यालयात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामदास तुमसरे , प्रस्तावणा श्री. प्रशांत दुर्गे यांनी केले तर आभार मनोज चामाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment