Ads

नियमित न चालविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करा

भद्रावती तालुका प्रतिनिधी: भद्रावती येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान क्र. ७१, सूर्यमंदिर वार्ड, बगडे वाडी (किल्ला वार्ड) हे मागील बरेच दिवसापासून १ ते ३१ तारखेपर्यत कधीच नियमीत चालू राहत नाही. त्यामुळे मोलमजूरी करणारे सकाळी ७ वाजेपासून दुकानासमोर बसून वाट पाहत राहतात व शेवटी दुकान‌ न उघडल्यामुळे ते परत जातात. त्यामुळे त्यांची कामावर जायची वेळ निघून जाते आणि त्यांची रोजी बुडत आहे.
त्यानंतर दुस-या दिवसीही दुकानासमोर तासनतास उभे राहून दुकान उघडत नाही आणि हे आता दैनंदिन झाले आहे. अश्या ब-याच नागरीकांच्या स्वाक्षरीने लिखीत तक्रारी ग्राहक पंचायत कडे आल्या आहे. त्यामुळे ग्राहकांच्या होणा-या गैरसोयीची गंभीर दखल घेऊन दुकान दारावर कारवाई करून ग्राहकांना नियमित धान्य पुरवठा होईल आणि नागरिकांचा शारिरीक, मानसीक व आर्थिक त्रास कमी होईल असे ठोस पाऊल उचलावे. तसेच शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकान दारांना यासंबंधी सुचना द्यावा. अशी मागणी ग्राहक पंचायत, भद्रावतीने केली आहे.
यावेळी पदाधिकारी वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, सुदर्शन तनगुलवार, मोहन मारगोनवार, केशव मेश्राम, गुलाब लोणारे आदी उपस्थित होते.
सरकारी स्वस्त धान्य दुकान उघडण्याची वेळ, उघडण्याचे दिवस, चालू महिन्यात कोणते धान्य आणि इतर राशन मिळणार, दुकानातील धान्याचा साठा, विकल्या जाणा-या वस्तूंच्या किमतीची माहिती इत्यादी माहीती बद्दल फलक लावणे अनिवार्य असतांना सुद्धा कोणत्याही स्वस्त धान्य दुकानां समोर असे फलक लागलेले दिसत नाही. त्यामुळे तहसिलदार साहेब यांनी गंभीरपणे याकडे लक्ष देऊन उचीत कारवाई करावी.
प्रविण चिमुरकर - सहसचिव
अ.भा. ग्राहक पंचायत, भद्रावती
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment