Ads

सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा नागभीड जंक्शन व वडसा रेल्वे स्टेशन येथे थांबा द्या तसेच पॅसेंजर गाड्या पुर्ववत नियमित सुरु करा - खा. अशोकजी नेते •

नागभीड :-गोंदिया - बल्लारपूर रेल्वे मार्गावरील एकमेव महत्वपुर्ण जंक्शन असलेले नागभीड जंक्शन स्टेशन व गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमात्र रेल्वे स्टेशन वडसा आहे. गोंदिया ते चांदाफोर्ट या २६२ किमी च्या मार्गावर चालणाऱ्या एकाही एक्सप्रेस गाडीला एकही थांबा नसल्याने जनतेमध्ये वाढता असंतोष दिसून येतआहे. त्याकरिता या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांनी वडसा व नागभीड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा तसेच कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या पुर्ववत नियमित सुरु करण्यासंदर्भातील निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मान.रावसाहेब दानवे यांना दिले.
गोंदिया - नागभीड - चांदाफोर्ट- बल्लारपुर या २६२ कि.मी च्या मार्गावरुन धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना एकही थांबा देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जसे जबलपूर चांदाफोर्ट एक्सप्रेस( 22174 - 22173 ), सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस (17007 - 17008), बिलासपुर चेन्नई एक्सप्रेस (12851 - 12852), यशवंतपुरम कोरबा व वैनगंगा एक्सप्रेस (12251 - 12252), हैदराबाद आर.एक्स.एल.
(17005 - 17006),एंव गया चेन्नई एक्सप्रेस (12389 -12390),इत्यादी या मार्गावरील सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा देण्यात यावा अशी मागणी भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे सदस्य संजय गजपुरे यांनी यापुर्वी खासदार अशोकभाऊ नेते यांना निवेदन दिले होते .
या निवेदनाची दखल घेत खा.अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व मागण्यांचे निवेदन देत या मार्गावरील एकमेव जंक्शन असलेल्या नागभीड व गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा येथे सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा देण्यात यावा तसेच गोंदिया - नागभीड- चांदाफोर्ट - बल्लारपुर या मार्गावरील कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या अनेक पॅसेंजर गाड्या अजूनही सुरु करण्यात न आल्याने दैनंदिन प्रवास करणारे चाकरमानी व प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून वेळेचाही अपव्यय होत आहे. या संदर्भात सुद्धा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी पॅसेंजर गाडी सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आदिवासीबहुल व जंगलव्याप्त गडचिरोली लोकसभा क्षेत्रात एकही थांबा नसल्याने नाराजी व्यक्त करीत या मार्गावरील नागभीड व वडसा या महत्वपूर्ण स्टेशनवर या गाडीचा थांबा देण्यात यावा तसेच पॅसेंजर गाड्या लवकर सुरु करण्यात याव्या याबाबत रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे यांच्या नवी दिल्ली येथील रेल्वे भवनातील दालनात सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
याप्रसंगी खास. अशोकजी नेते, चंद्रपुर जिल्हा भाजपा महामंत्री संजयजी गजपुरे,भाजपाचे जेष्ठ नेते व नगरसेवक मनोजभाऊ वठे उपस्थित होते. तसेच या मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री नाम. अश्विनजी यांनाही देण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment