Ads

मंगळवेढा तालुक्यातील डॉक्टरांवर होणाऱ्या चुकीच्या कारवाई थांबवा अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडू : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

सोलापूर :- मंगळवेढा तालुक्यातील डॉक्टरांवर होणाऱ्या चुकीच्या कारवाई थांबवा अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडू असा इशारा आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिला आहे.
पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करत असताना होणाऱ्या चुकीच्या कारवाईला कायमस्वरूपीचा आळा घालण्याचा प्रयत्न राज्यभर चालू आहे व डॉक्टरच्या न्याय आणि हक्कासाठी दिवस रात्र झटत असणारे आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करत असताना होणाऱ्या चुकीच्या कारवाई थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व पॅथीचे ज्ञान व प्रशिक्षण द्यावे कोणतीही पारंपारिक पॅथीचे ज्ञान व माहिती कोणत्या वैद्यकीय अधिकार्याकडे अध्याप उपलब्ध नाही केंद्र शासन राज्य शासन यांचे आदेश तसेच कोर्टाचे आदेश न बघता होणाऱ्या चुकीच्या कारवाया थांबल्या पाहिजेत नाहीतर आम्ही सर्व डॉक्टर एकत्रित येऊन सोलापूर जिल्हा भर आंदोलन छेडू व मंगळवेढा तालुक्यात सहा डॉक्टरांना मा.मंगळवेढा न्यायालयाने पॅथी प्रमाणे प्रॅक्टिस करण्याचा आदेश दिलेला आहे तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तो आदेश देऊन ही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. व चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यास पुढील पाऊल टाकत आहेत तुम्ही तर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत असाल तर आम्ही मुळीच गप्प बसणार नाही व आम्हाला दहा दिवसांमध्ये लेखी उत्तर मिळावे अन्यथा सोलापूर जिल्हा भर आंदोलन छेडू असा इशारा आयुष भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment