Ads

SRK कंपनीवर कारवाई करुन काळ्या यादीत टाका - हंसराज अहीर चारगांव धरणाची सिंचन क्षमता वाढवून अतिरीक्त कालव्याची निर्मिती करावी

चंद्रपूर:-  वरोरा तालुक्यातील चारगाव तलावाच्या सिंचन क्षमतेत वृृध्दी करुन अतिरिक्त कालव्याची निर्मिती करावी. वरोरा-शेगाव-चिमुर रस्त्याच्या बांधकामाबाबत अक्षम्य दिरंगाई व हलगर्जी करणाऱ्या  SRK  कंपनीवर कठोर कारवाई करुन या कंपनीस तात्काळ काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
शेगांव बु(ता वरोरा) येथे दि 16 ऑगस्ट  रोजी पार पडलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या  बैठकीत SRK  कंपनीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी  तक्रार केली असता हंसराज अहीर यांनी गांभीर्याने दखल घेत कंपनीवर कारवाई करण्यासंदर्भात संकेत दिले.  यावेळी अहीर यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
         केंद्र सरकारच्या ग्रामिण विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा
बैठकीमध्ये श्री अहीर यांनी शक्ती केंद्र व बुथ केंद्राबाबत माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करुन बूथ व शक्ती केंद्राच्या विस्ताराबाबत अधिकाधिक प्रयत्न करावे असे आवाहन केले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी  ग्रामिण विकासाच्या तसेच सामाजिक उत्थानाविषयीच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या असून पदाधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत  पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही हंसराज अहीर यांनी सुचना केली.
सदर बैठकीस चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, पूनम तिवारी, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी राजू बच्चूवार, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्राी सचीन नरड, गोंविंदा कष्टी, ईश्वर नरड, अभिजीत पावडे, शरद कष्टी, महेश देवतळे, गुणवंत देहारकर, शंकर खांडे, श्रावण जिवतोडे, उमेश दडमल यांचेसह भाजप कार्यकत्यांची उपस्थिती होती.       

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment