Ads

उत्कृष्ठ कामगिरी बाबत सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- महसुल दिनाचे निमीत्ताने 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आयोजीत कार्यक्रमात सिंदेवाही तहसिल कार्यालयातील तहसिलदार गणेश जगदाळे यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत जिल्हाधिकारी मा. अजय गुल्हाने साहेब यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सिंदेवाही तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून महसूल विभागात उत्तम कामगिरी व उत्कृष्ट असे उल्लखनीय कार्य केल्याबद्दल तसेच सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांचे तहसील कार्यालयातील कामांसाठी तहसीलदार गणेश जगदाळे हे जातीने लक्ष देत सहकार्य करत असतात. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत चंद्रपूर चे जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने साहेब यांनी महसूल दिनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment