Ads

देशातील वाढती महागाई केंद्र सरकारचे पाप

चंद्रपूर :- देशातील जनतेला अच्छेदिनाची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मागील आठ वर्षात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलिंडरचे दर दिवसागणिक वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तुंवरही जीएसटी लावण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले. हे सर्व केंद्र सरकारचे पाप असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला.
Rising inflation in the country is the sin of the central government
महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जिवनावश्यक वस्तुंवरील वाढविलेल्या जीएसटीविरोधात आंदोलन करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) येथील जटपुरा गेट परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी बोलत होते.
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जिवनावश्यक वस्तुंवर लावण्यात आलेल्या जिएसटीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली. आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांच्यासह माजी नगरसेवक, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक सेलसह अन्य विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment