Ads

शिक्षक महाआघाडीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:-गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक दिनांक ४ सप्टेंबर २०२२ ला होऊ घातली आहे.सदर निवडणुकीमध्ये पदवीधर मतदार संघाकरिता यंग टीचर्स असोसिएशन, विदर्भ माध्यमिक संघ, नूटा, विजुक्ता, गोंडवाना शिक्षक संघटना, पंजाब राव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र व्होकेशनल टीचर असोसिएशन अशा शिक्षक संघटना एकत्र येवून शिक्षक महाआघाडी स्थापन करूण सुधाकरराव अडबले सहकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व डाॅ.प्रदिप घोरपडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवीत आहे. Republican Party Support for Teachers' Union Candidates
समविचारी मंडळींच्या वतीने नागभिड येथील महात्मा गांधी महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुधाकरराव अडबले सहकार्यवाह डॉ. सतीशभाऊ वारजूरकर माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर, डॉ. अनिल शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोकभाऊ रामटेके, सूर्यकांत खनके, मा. जगदिश जुनघरी, डॉ. प्रदीप घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी डॉ. रघुनाथ बोरकर डॉ. मोहन जगनाडे, रमाकांत लोधे, प्राध्यापक तेलखेडे, प्रा. विजय धरत, मा. स्वप्नील कावळे इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. गोविंदराव भेंडारकर यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सतीश मेश्राम यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये पदवीधर मतदारसंघातील डॉ. दिलीप चौधरी, अँड. गोविंद भेंडारकर ,अजय लोंढे, चंद्रशेखर जुमडे , विजय कुत्तरमारे,दीपक धोपटे, तनुश्री आत्राम, राजेंद्र कन्नमवार,सुनील शेरकी, सौ. विद्या शिंदे, या दहा ही उमेदवारांनी आपला परिचय करून दिला, व विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून गोंडवाना विद्यापीठात खलील प्रमाणे केलेल्या कामाची माहिती दिली.
१) गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर शेतजमीन मिळावी याकरिता शासन स्तरावर व विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा केला.
२) गोंडवाना विद्यापीठाला १२ इ चे प्रमाणपत्र मिळावे व नॅक चे नामांकन व्हावे याकरिता सतत पाठपुरावा केला.
३) गोंडवाना विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सतत पाठपुरावा केला.
४) गोंडवाना विद्यापीठाच्या विधीशास्त्र व आजशास्त्र अभ्यासक्रमामध्ये जादूटोणा
विरोधी कायदा २०१३ चा समावेश करण्यात सक्रिय पुढाकार अशा प्रकारचा
कायदा लागू करणारे गोंडवाना विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले.
५) गोंडवाना विद्यापीठाच्या हक्काचे २७८ कोटी ५५ लाख रूपये राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज नागपूर विद्यापीठातून मिळावे याकरिता सतत पाठपुरावा केला.
६) गोंडवाना विद्यापीठांमध्ये विभागीय व सहसंचालक कार्यालय सुरू व्हावे याकरिता सतत पाठपुरावा केला.
७) गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू व्हावे याकरिता सतत पाठपुरावा केला.
८) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्यासन केंद्र सुरू व्हावे याकरिता सिनेटमध्ये ठराव व लागू करण्यात सक्रिय सहभाग.
९) आदिवासी साहित्य संस्कृती अध्यासन केंद्र सुरू व्हावे याकरिता विद्यापीठ स्तरीय
समितीचे सदस्य तथा सक्रिय सहभाग.
यावेळी उमेदवार सुनील शेरकी यांनी मतदान पद्धती आणि प्रक्रिया याविषयी माहिती दिली. डॉ. गणपतराव देशमुख उपस्थित होते, सदर कार्यक्रमात माननीय अशोकजी रामटेके उपाध्यक्ष नगरपरिषद ब्रह्मपुरी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ऍड गोविंदराव भेंडारकर, श्री अशोकजी रामटेके,डॉ लालाजी गेडाम,श्री भाऊरावजी राऊत,डॉ राकेशजी राऊत, श्री उदय पगाडे,श्री सुधाकरजी पोपटे,प्रा. गायधणे,श्री धनंजय राऊत,श्री अरविंद नागोसे, श्री निकेश तोंडरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment