Ads

भद्रावती येथे पीओपीच्या गणेश मुर्त्या जप्त.

भद्रावती:- भद्रावती येथील एका गणेश मूर्ती विक्रेत्याकडून पीओपीच्या अकरा गणेश मुर्त्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई दि. 30 रोज मंगळवारला शहरातील कुंभार मोहल्ला येथे नगर परिषद व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे करण्यात आली. मनोज बोरसरे राहणार कुंभार मोहल्ला भद्रावती असे या मूर्ती विक्रेत्याचे नाव आहे.POP's Ganesha idol seized at Bhadravati.
शहरातील कुंभार मोहल्ला येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विकत असल्याची तक्रार नगरपरिषद कार्यालयाला प्राप्त झाली होती .या तक्रारीची दखल घेत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मनोज बोरसरे यांच्या घरी पीओपीच्या अकरा गणेश मुर्त्या आढळून आल्या. बाजारात पीओपीच्या मुर्त्या विकण्यास निर्बंध असल्यामुळे या पथकाद्वारे अकरा गणेश मुर्त्या जप्त करून त्या सील करण्यात आल्या व या विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आली. पीओपीच्या मुर्त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नसून त्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात ,त्यामुळे 2 मे 2020 च्या केंद्रीय नियमक मंडळाच्या गाईडलाईन नुसार निर्बंध लावण्यात आले आहे. शहरातील मूर्ती विक्रेत्यांनी पीओपीच्या मुर्त्यांची विक्री करू नये तसेच ग्राहकांनी सुद्धा या मुर्त्या घेऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार ,उपमुख्याधिकारी जगदीश गायकवाड, निलेश रासेकर, भुजंग पोटे, निखिल आष्टुनकर आदी सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment