Ads

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या जुगार खेळणारे व दारू विक्रेत्यांवर ब्रम्हपुरी पोलीसांची धडक कार्यवाही

ब्रम्हपुरी :- पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी हद्दीत अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या इसमावर व अवैधरीत्या दारू विक्री Illegal sale of alcohol करण्यान्या इसमावर ब्रम्हपूरी पोलीसांनी रेड टाकून धडक कार्यवाही केली. एकूण 424430 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येउन आरोपीविरूध्द पोलीस ठाण्यात विविध कमलान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दि. 22/08/22 रोजी दुपारी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजा फुले नगर परीसरात काही लोक तारापत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत Illegal gamblers . त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन रेड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 6 जणांना पकडण्यात पोलीसांना यश आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 5600 रू. नगद रक्कम तसेच 6 मोबाईल एकूण किंमत 26000 रू. 3 मोटारसायकल किंमत 110000 रू व 50 रू. ताशपत्ते असा एकूण 143250 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच दि. 25/08/22 रोजी दुपारी पोलीसांनी मौजा देलनवाडी तलावाच्या परीसरात जुगार रेड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 6 जणांना पकडण्यात पोलीसांना यश आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 3800 रु. नगद रक्कम, तसेच 6 मोबाईल एकूण किंमत 21000 रू. 5 मोटारसायकल किंमत 205000 रू. व 50 रू. ताशपत्ते असा एकूण 229850 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणाऱ्यांना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच पोळा सणाच्या लगतच्या काळात ब्रम्हपुरी पो.स्टे.. हद्दीतील मौजा वांद्रा, तोरगाव खुर्द, माहेर कुडेसावली, बोंडेगाव, हनुमानगर, पींपळगाव भो, चिंचखेडा, गांगलवाडी व रानबोथली गावात अवैध दारूबाबत मोहीम राबवून 10 लीटर मोहाची दारू किं. 2000 रू चे सह 418 नग देशी दारू किं. 16330 रू चा माल व एक मोपेड गाडी 35000 रू. जप्त करण्यात आली. तसेच आगामी गणपती व इतर सणांच्या निमीत्ताने पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी तर्फे अशा प्रकारच्या विविध गुन्हे करणाऱ्यावर धाडी येईल. टाकून कडक कार्यवाही करण्यात

वरील कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीय अधिकारी, ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी मोरेश्वर लाकडे, स्वप्नील गेडाम, हरीदास सुरपाम, मूकेश गजबे, योगेश शिवनकर, पवन डाखरे, नरेश कोडापे, विजय मेद, संदेश देवगडे, अजय कटाईत व चंद्रशेखर कांबळे यांनी कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment