Ads

अकोल्यातील डॉक्टर दाम्पत्यावर चंद्रपुरात गुन्हा दाखल

चंद्रपूर/दुर्गापूर : अकोला जिल्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ ज्ञानेश्वर तराळे आणि त्यांच्या पत्नी डॉ मोनिका ज्ञानेश्वर तराळे यांच्यावर चंद्रपूर दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका यांच्या बहिणीच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 294, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Durgapur police त्यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार मोनिका तराळे यांची बहीण अर्पणा हिचे लग्न 2018 मध्ये चंद्रपूर येथील निलेश भटकर याच्याशी झाले. मात्र माहेरच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली.

Death threats 23 जून 2021 ला अपर्णा भटकर ही दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिने तिची बहीण डॉ मोनिका तराळे आणि भावजी हाँ ज्ञानेश्वर तराळे यांना बोलावून घेतले. यावेळी या दोघांनीही फिर्यादी निलेश भटकर याला धक्काबुक्की करीत अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. Obscene abuse यानंतर अपर्णा तिच्या माहेरी कोल्हापूरला निघून गेली. 15 जून 2022 ला निलेश तिला परत आणण्यासाठी गेला असता पुन्हा त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानुसार फिर्यादी निलेश भटकर याने दुर्गापूर पोलीस ठाण्यात अपर्णा भटकर, तसेच डॉ मोनिका तराळे आणि डॉ ज्ञानेश्वर तराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment