Ads

अनुभूती प्रशाळा (वासू फॉउंडेशन) येथील दहीहंडी विद्यार्थिनी साठीजीवघेणी..!

ब्रम्हपुरी :-आजची मुलगी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे मग ते क्षेत्र क्रीडा असो की राजकारण, घर असो वा उद्योग. सर्वच क्षेत्रात मुलींचा समान सहभाग आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे आहे.मात्र तिला नाऊमेद करीत असल्याची एक घटना ब्रम्हपुरी शहरातील अनुभूती प्रशाळा येथे घडली आहे. इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील श्री.प्रवीण शिवनकर यांची लाडाची निरागस लेक "हिमानी"..! अवघ्या नऊ वर्षाची हिमानी विना प्रशिक्षण, कसलीही माहिती नसतांना फक्त शिक्षकांच्या सांगण्यावरून भीती पोटी शाळेच्या "दहीहंडी" फोडण्याच्या कार्यक्रमात 19/08/2022 ला सकाळला कृष्ण जन्माष्ठमी पर्वावर सहभागी व्हावे लागले व त्या दरम्यान झालेल्या अपघातात जबर जखमी झाल्याने तिच्या पालकांनी पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी गाठत सदर शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केल्याने तालुक्यात सर्वत्र शाळा व्यवस्थापनावर मोठा रोष व्यक्त केल्या जातं आहे.Life threatening for Dahihandi student of Anubhuti Prashala (Vasu Foundation)
ब्रम्हपुरी शहरातील बालाजी वार्डातील श्री.प्रविण ज्ञानेश्वर शिवणकर यांची लहान मुलगी हिमानी वय 9 वर्ष ही अनुभुती प्रा. शा. रेणुका माता चौक ब्रम्हपुरी येथे 4 थ्या वर्गात शिकत आहे. दिनांक 19 आगॅस्ट 22 ला शाळेला शासकीय सुट्टी असताना सुद्धा अनुभुती शाळेचे संस्थापक अर्चना नंदुरकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दही हांडीचा कार्यक्रम असल्याने सकाळी शाळेत यायला सांगितले होते. त्यामुळे कु. हिमानी ही शाळेत गेली होती. दुपार सुमारास प्रवीण शिवणकर हे घरी असतांना अंदाजे 12:30 वा. दरम्यान शाळेतील चपराशी यांनी घरी येवुन सांगितले की, हिमानी ही दहीहंडी खेळत असतांना खाली पडली व तीला सरकारी दवाखाना ब्रम्हपुरी येथे उपचारास नेले आहे. ही माहीती मिळताच शिवणकर व त्यांच्या पत्नी दोघेही सरकारी दवाखाना ब्रम्हपुरी येथे गेले.असता हिमानीच्या उजव्या हाताचा एक्सरे काढण्याकरीता कर्मचारी नेतांना दिसले तेव्हा हिमनीला वडिलांनी काय घडलं विचारणा केली असता हिमनीने सांगितले की, शाळेत दही हंडी कार्यक्रम सुरु असतांना आमचे शाळेचे सहा विद्यार्थी खाली व त्याच्या वरती मी व तीन विद्यार्थी त्यांच्या वरती दोन विद्यार्थी होते. तोल गेल्याने ते खाली पडले त्यांच्या बरोबर मी सुध्दा खाली पडली त्यात माझ्या उजव्या हाताच्या मनगटाला जबर मार लागल्याने शाळेतील टिचर यांनी मला उचलुन दवाखाण्यात आणले आहे.प्रशासनाने सरकारी सुट्टी मंजुर करुन सुध्दा अनुभुती प्रशाळा अध्यापकांनी सर्व मुलांना शाळेत दही हंडीच्या कार्यक्रमात बोलावुन लहान मुलांना कोणतेही प्रशिक्षण न देता दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम निष्काळजीपणे केला. त्यामुळे हिमानीला दही हंडी फोडतांना खाली पडुन तीच्या उजव्या हाताला जबर मार लागुन दुखापत झाली आहे.त्यामूळे मुख्याध्यापक व शाळा प्रशासन यांचे विरुध्द कार्यवाही करण्यात यावी याकरिता
श्री प्रवीण शिवणकर यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तोंडी रिपोर्ट दिली आहे.सदर गुन्हात कलम 336,338, 34 अंतर्गत गुन्हाची नोंद झाली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

लहान लहान मुलांच्या भवितव्याचा कुठलाही विचार नं करता फक्त आपल्या शाळेची प्रतिमा मोठी दिसावी या करीता मुलांकडून असले अमानवीय कृत्य करून घेणाऱ्या शाळेची संख्या ब्रम्हपुरी शहरात जास्त आहे मात्र "अती झालं अन हसू आलं"..! उक्तीनुसार बऱ्याच शाळेकडे स्वतःचे ग्राउंड नसतांना व मैदानी खेळ शिकवणारे कुठलेही प्रशिक्षक नसतांना शाळा असा उठाठेव करून बसतात व विध्यार्थ्यांचा आयुष्य बरबाद करीत आहेत तेव्हा पालकांनी वेळीच सावध होतं अश्या व्यावसायिक शाळा जे मोठ्या प्रतिमेसाठी बालकांचे नुकसान करतात त्यांना त्यांची योग्य जागा दाखवावी अशी विनंती पालक वर्गातून होतं आहे.
*सदर बाब त्या शाळेशी संबंधित असल्याने शाळेने योग्य सुविधेसह खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळेची भेट घेऊन सदर प्रकरणाची चौकशी लवकरचं करण्यात येईल. सद्यस्थितीत आमच्या कडे तक्रार आलेली नाही मात्र सदर घटनेची आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही कारवाई नक्कीच करणार व इतरही शाळांना सूचना करणार*
श्री.खुणे
शिक्षणाधिकारी पं.स.ब्रम्हपुरी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment